• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची राज्याचे कामगार कल्याण मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून पाहणी

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
August 28, 2023
in आपले शहर
0
अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची राज्याचे कामगार कल्याण मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून पाहणी
0
SHARES
11
VIEWS

पिंपरी, दि. २८ – जागा हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणा-या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी आज राज्याचे कामगार कल्याण मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी केली. या भूखंडावर राबविण्यात येणा-या बहुउद्देशीय प्रकल्पाबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश डॉ. खाडे यांनी यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रशासनाला दिले. या पाहणी दौ-यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मुंबई येथील कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुण्याचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, राजेंद्र शिंदे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, उप अभियंता सुभाष काळे, सहाय्यक नगररचनाकार अक्षय कुंभार, सर्व्हेअर घनश्याम गवळी, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसवे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी उपमहापौर केशव घोळवे, तुषार हिंगे, माजी नगरसेवक शंकर जगताप, नामदेव ढाके, अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध भूखंडासंदर्भात महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामध्ये जागा हस्तांतरणाच्या बाबत करारनामे झालेले आहेत. यातीलच पिंपरी मधील मोरवाडी अजमेरा येथील भूखंड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास देण्यासंदर्भात कार्यवाही प्रस्तावित आहे. या भूखंडावर कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार कल्याणासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत कामगार कल्याण मंत्री डॉ. खाडे यांनी या जागेची पाहणी केली. या जागेवर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत विविध सूचना डॉ. खाडे यांनी कामगार मंडळ प्रशासनाला केल्या तसेच जागा हस्तांतरणाच्या सद्यस्थितीबाबत देखील त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, संभाजीनगर मधील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात कामगार मंत्री डाॅ. खाडे यांनी महापालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला तसेच जागा हस्तांतरण आणि प्रस्तावित उपक्रमाबाबत विविध सूचना केल्या. महापालिका आणि कामगार कल्याण मंडळामध्ये झालेल्या करारनाम्यासंदर्भात तसेच जागा हस्तांतरणाबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयखोराटे तसेच भूमी व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी कामगार मंत्री डॉ. खाडे यांना सविस्तर माहिती दिली. बैठकीस कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह महापालिकेचे कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, राजेंद्र शिंदे, उपअभियंता विजय भोजने, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप आदी उपस्थित होते.

Views: 119
Previous Post

पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या-उपमुख्यमंत्री

Next Post

“उद्धव श्री” पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी येथे – ॲड. गौतम चाबुकस्वार अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
“उद्धव श्री” पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी येथे – ॲड. गौतम चाबुकस्वार अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

"उद्धव श्री" पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी येथे - ॲड. गौतम चाबुकस्वार अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!