अहमदनगर : प्रतिनिधी ( सुखदेव गायकवाड ) सोमवार दि २६/१२/२०२२ रोजी शेवगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी हजरत सय्यद सोनामिया वली यात्रेत फुलांच्या चादरीची मिरवणूक काढली शेवगाव पोलिस स्टेशन कडून या करिता रात्री १० वाजता वेळ देण्यात आली होती परंतु रात्री ९ वाजता मिरवणूक शिवाजी चौक येथे आली असता तेथे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी शेवगाव पोलिस निरीक्षक विलास पुजारी हे आले व म्हणाले की डीजे वाजवू नका काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की साहेब आम्हाला १० वा पर्यंत वेळ देण्यात आली आहे आम्हाला फक्त “”तुम्ही कितीही लावा शक्ती कितीही लावा युक्ती तुम्ही किती करा हल्ला लई मजबूत भिमाचा किल्ला”””* हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे वाजवू द्या आम्ही मिरवणूक बंद करतो मोठी विनवणी केल्यानंतर हे गाणे वाजवायला परवानगी दिली गाणे सुरू होताच पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी आपल्या सोबत आणलेले पोलिस कर्मचारी,सी आर एफ च्या जवांनानी काहीही कारण नसतांना लाठीचार्ज केला या लाठीचार्ज मध्ये महीला, लहान मुले,तरुण युवक मोठ्या प्रमाणात जखमी झाले या बाबत प्रा किसन चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक अहमदनगर ओला साहेब यांना या घटनेची माहिती कळवली तत्परता दाखवून पोलिस अधीक्षक यांनी डीवायएसपी संदिप मिटके , विलास पाटील, नेवासा पोलिस निरीक्षक कर्हे एपीआय चौधरी यांना शेवगाव येथे रवाना केले तो पर्यंत प्रा किसन चव्हाण यांनी रात्री १२/३० वाजेपर्यंत ठीय्या आंदोलन केले या प्रसंगी सर्व समाजातील दिड ते दोन हजार युवक उपस्थित होते जो पर्यंत शेवगाव चे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तातडीने बदली करत नाही तो पर्यंत हे आंदोलन चालू राहणार अशी भुमिका आंदोलनकांनी घेतली या प्रसंगी सर्व महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या सर्व अधिकारी आले नंतर सविस्तर चर्चा करुन आंदोलन स्थगित करण्यात आले या वेळी डीवायएसपी मिटके म्हणाले की योग्य दिशेने तपास करून ,सर्व सीसीफुटेज , पुरावे जमा करून दहा दिवसात दोषींवर कारवाई केली जाईल या नंतर सर्व समाज बांधव व पोलीस अधिकारी यांनी हजरत सय्यद सोनामिया वली दर्गाह येथे चादर अर्पण करून दर्शन घेतले या बाबत वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई म्हणाले की या निंदनीय घटने बाबत शेवगाव चे मुस्लिम बांधव, सर्व समाज बांधव मा पोलिस अधीक्षक अहमदनगर ओला यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदन देणार आहे या निंदनीय घटनेचे सर्व सबळ पुरावे आमच्याकडे आहेत






