• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 11, 2022
in आपले शहर
0
चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार
0
SHARES
2
VIEWS
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडची धार्मिक ओळख असलेल्या चिंचवडगावातील मोरया गोसावी चिंचवड देवस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि मोरया गोसावी मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्राप्रमाणे विकास करण्यासाठी निधी मिळावा यासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून मोरया गोसावी मंदिर परिसराच्या विकासाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. आता पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात चिंचवड देवस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा केल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.मोरया गोसावी महाराज यांनी चिंचवडगावातील पवना नदीकाठी संजीवन समाधी घेतली. ते १४ व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी महाराज यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव यांनी समाधीवर श्रीगणेशाची स्थापना करून मंदिराची उभारणी केली. मोरया गोसावी महाराजांची संजीवन समाधी आणि मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण आहे. मोरया गोसावी मंदिर हे पिंपरी-चिंचवडकरांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोरया गोसावी मंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.राज्य सरकारच्या संबंधित विविध विभागाकडे पत्रव्यवहार करून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला “क” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती. त्याचप्रमाणे विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून मोरया गोसावी मंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा याकडे त्या त्या वेळच्या राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. तीर्थक्षेत्राचा दर्जा घोषित करून मंदिर व मंगलमूर्ती वाडा परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे, पादुका मंदिर, संभामंडप व संरक्षण भिंत उभारण्यात यावे, मुख्य प्रवेशद्वाराचे संवर्धन करण्यासाठी त्याच्या दर्जामध्ये वाढ करावी, मंदिर परिसरातील पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी, भक्तांसाठी स्वच्छ व पुरेसे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी टाकी उभारावी, स्वच्छतागृह उभारावे, समाधी मंदिर सभोवतीच्या पटांगणामध्ये दगडी पायऱ्यांचे बांधकाम करावे, दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, भक्तनिवास, वेदपाठ शाळा तसेच भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात यावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी सरकारकडे केली होती.आमदार जगताप यांच्या सततच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी बोलताना मोरया गोसावी मंदिर परिसराला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. तसेच या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी तातडीने यावर्षीचा निधी तातडीने देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या प्रयत्नांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यश आल्याचे त्यांनी सांगितले. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे मोरया गोसावी मंदिर परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याबद्दल आमदार जगताप यांनी पालकमंत्री पाटील यांचे आभार मानले आहेत. —
Views: 124
Previous Post

कराळे पाटील एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उदघाटन व हेली बे हेली पोर्टचे भूमिपूजन कार्यक्रम रविवारी संपन्न

Next Post

पुनवळा येथे बसच्या धडकेत मोटर सायकल स्वार जागीच ठार

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post

पुनवळा येथे बसच्या धडकेत मोटर सायकल स्वार जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!