• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पुणे जिल्ह्यात गोवरचा शिरकाव ; पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी पाच रुग्ण

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 30, 2022
in आपले शहर
0
पुणे जिल्ह्यात गोवरचा शिरकाव ; पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी पाच रुग्ण
0
SHARES
13
VIEWS

पिपरी : प्रतिनिधी : मुंबईकरांची झोप उडविणार्‍या गोवरने अखेर पुणे जिल्ह्यात शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पाच बालकांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मंगळवारी खळबळ उडाली.

पाच संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह आले असून उद्रेक होऊ नये, यासाठी पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गोवर आजाराच्या सातपैकी पाच संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह आहेत. कुदळवाडी परिसरातील बालकांना लागण झाली आहे. या रुग्णांची रक्त तपासणी व घशातील द्रावाची तपासणी मुंबई येथील हाफकिन येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून कुदळवाडी परिसरात गोवर या आजाराचा उद्रेक घोषित करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये गोवर या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरात गोवरचे रुग्ण आढळल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात गोवरचे तीन रुग्ण आढळले होते. तर, मंगळवारी (दि. 29) पाच रुग्णांच्या घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. राज्यातील इतर शहरात गोवरचे रुग्ण आढळू लागल्यानंतर महापालिकेकडून रहिवाशी क्षेत्रात गोवर आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यात येणार्‍या क्षेत्रामध्ये नऊ महिने ते 5 वर्ष या वयोगटातीलगोवरसदृश आजाराची लक्षणे आढळून येणार्‍या बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यांच्या गोवर प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच, ज्यांनी गोवर लसीकरणाचे डोस घेतलेले नाही, त्या बालकांना अ जीवनसत्त्वाचा डोस देण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

अशी घ्या काळजी…

आपल्या कुटुंबातील तसेच परिसरातील मुलांचेगोवरचे लसीकरण झाले आहे का, याबाबत चर्चा आवश्यक.मुलांमध्ये ‘फिव्हर विथ रॅश’ अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा.सर्वेक्षण तसेच लसीकरणासाठी येणार्‍याकर्मचार्‍यांना सहकार्य करा.मुलांमध्ये ताप, अशक्तपणा अशी लक्षणे असल्यास डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि द्रवपेयांचे सेवन करा.गोवर टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.गोवर टाळण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा वापरही खूप फायदेशीर आहे. हे खाज कमी करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्याने फायदा होतो.गोवरच्या रुग्णाने नारळपाणी सेवन करावे. याचे सेवन शरीराला पाण्याच्या कमतरतेपासून वाचवण्याचे काम करते आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.

गोवरपासून आवश्यक बचावासाठी आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. ज्या बालकांचे गोवर लसीकरण राहिले आहे, त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. बालकांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी अंगणवाडी, बालवाडी सेविकांची बैठक घेऊन त्यांना दक्षता घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.

डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंंपरी-चिंचवड महापालिका

Views: 111
Previous Post

भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिका पर्यंत पोहचलं पाहिजे आणि सर्वानी ते आत्मसात करायला हवं – धम्मराज साळवे

Next Post

ऐतिहासिक ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ची ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद- अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांची माहिती- तब्बल २० हजारहून अधिक सायकलिस्टची उपस्थिती

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
ऐतिहासिक ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ची ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद- अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांची माहिती- तब्बल २० हजारहून अधिक सायकलिस्टची उपस्थिती

ऐतिहासिक ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ची ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद- अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांची माहिती- तब्बल २० हजारहून अधिक सायकलिस्टची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!