• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

समाविष्ट गावांतील सर्वांत मोठे हॉस्पिटल मोशीत- आरक्षण हस्तांतरणास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची अखेर मंजुरी- हॉस्पिटलसह पॅरामेडिकल कॉलेज उभारण्यासाठी प्रशासनाचे नियोजन

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 1, 2022
in आपले शहर
0
भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार
0
SHARES
5
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर सुमारे २० वर्षे पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांतील सर्वात मोठे अर्थात ८५० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मोशी येथील गायरान जमीनीवर प्रस्तावित हॉस्पिटल होणार असून, संबंधित जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला देण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.‘‘भोसरी व्हीजन- २०२०’’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २०१७ पासून आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. गाव तिथे रुग्णालय या संकल्पनेतून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यासाठी चिखली, मोशी, चऱ्होली येथील मोकळ्या जागा प्रशासनाला सूचवल्या होत्या. यासह भोसरी विधानसभा मतदार संघातील जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार लांडगे यांनी बैठक घेतली होती.यावेळी चिखली, मोशी, चऱ्होली या भागात जागा निश्चित करुन मोठे हॉस्पिटल उभारण्यासाठी जागेची निश्चित करावी. तसेच, यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण कमी व्हावा. याकरिता समाविष्ट गावांमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून उभारावे, असा संकल्प होता. त्यासाठी चिखली, मोशी, चऱ्होली या गावांतील जागा जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली होती.दरम्यान, अवघ्या ७ दिवसांत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मोशी येथील प्रस्तावित जागेचा रुग्णालयाच्या उभारणीसाठी ताबा देण्यासाठी मंजुरी दिली आहे. यापूर्वी, चिखली येथील जागा रुग्णालयासाठी प्रस्तावित होती. मात्र, सदर जागा वनविभागाच्या अंतर्गत येत असल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मोशी येथील जागा निश्चित करण्यात आली. त्याला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे चिखलीजवळ आणि मोशीत ८५० बेडचे हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला.मौजे मोशी, ता. हवेली येथील ग. नं. ६४६ पै. मधील आरक्षण क्रमांक १/१८९ मनपा उपयोग (हॉस्पिटल) जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेस मनपा उपयोग या प्रयोजनार्थ आगाऊ ताबा देण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने हॉस्पिटल या प्रयोजनासाठी जमीन हस्तांतरण करण्याबाबत मागणी केली होती.*वायसीएम हॉस्पिटलवरील ताण कमी होणार…पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. चिखली, मोशी, चऱ्होली असा ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, जुन्नर, आंबेगाव या भागातून वायसीएम रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्यस्थितीला २८ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून चालवले जाणारे वायसीएम हॉस्पिटलवर ताण येतो. पार्किंग आणि वाहतुकीचीही समस्या आहे. आता मोशीत उभारण्यात येणाऱ्या ८५० बेडच्या हॉस्पिटलमुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार असून, समाविष्ट गावांसह महापालिका हद्दीलगतच्या ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध होवून दिलासा मिळणार आहे.**पॅरामेडिकल कॉलेजच्या दृष्टीने नियोजन…मोशी येथील प्रशस्त जागेत तब्बल ८५० बेडचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी पिंपरी-चिंचवड मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कोर्सेस कॉलेज, नर्सिंग कॉलेज उभारण्याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक असून, त्यादृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे.

Views: 134
Previous Post

ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला.

Next Post

कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे दिवाळी सणाचे मोठे गिफ्ट : एक पगार बोनस म्हणुन जाहीर ! मुख्यमंत्र्याने केली मोठी घोषणा .

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे दिवाळी सणाचे मोठे गिफ्ट : एक पगार बोनस म्हणुन जाहीर ! मुख्यमंत्र्याने केली मोठी घोषणा .

कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे दिवाळी सणाचे मोठे गिफ्ट : एक पगार बोनस म्हणुन जाहीर ! मुख्यमंत्र्याने केली मोठी घोषणा .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!