दिवाळी तसेच ईद सणानिमित्त कर्मचाऱ्यांना सण अग्रिम तसेच बोनस जाहीर करण्यात येते .सदरची रक्कम बिनव्याजी असल्याने , कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळत असतो .सदर अग्रिम रक्कमाची वसुली कर्मचाऱ्यांच्या 10 समान हप्त्यामध्ये करण्यात येते .सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना 12,500/- रुपये दिवाळी सण अग्रिम जाहीर करण्यात येते .राज्यातील महानगरपालिका अंतर्गत कार्यरत कर्मचारी , महापालिकेचे शिक्षक , तसेच बेस्टचे कर्मचाऱ्यांना यांना दिवाळी सणानिमित्त बोनस जाहीर करण्यात आले आहे .या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी 22,500/- रुपये बोनस जाहीर करण्यात आले आहे .त्याचबरोबर आरोग्य सेविकांना त्यांच्या मासिक पगाराच्या एक पगार दिवाळी बोनस म्हणुन म्हणुन जाहीर करण्यात आली आहे . या संदर्भातील अधिकृत्त घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली आहे .त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देखिल बोनस जाहीर करण्यात आला आहे .मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने , कर्मचाऱ्यांच्या बोनस मध्ये वाढ करुन कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडुन खुश करण्यात येत आहे .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करुन म्हणाले कि , आनंदात दिवाळी साजरा करा .शिवाय कोरोना कालावधी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले .