• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांकडे मागणी

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 20, 2022
in आपले शहर
1
गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांकडे मागणी
0
SHARES
13
VIEWS

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. हा शहरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांवरील अन्याय आहे. महापौर नाहीत म्हणून महापौर निधीऐवजी अन्य मार्गाने गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत देण्याचा पर्याय प्रशासनाने काढायला हवा होता. पण तसे झालेले नाही. प्रशासन अजूनही गाढ झोपेतच आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही “शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना” लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शहरातील गोरगरीब व गरजू रुग्णांच्या औषधोपचारासाठी, मानवनिर्मित आपत्तीसमयी पीडितांना अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने ४ सप्टेंबर १९९९ रोजी धर्मदाय आयुक्तांकडे पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरीटेबल ट्रस्ट या नोंदणीकृत असलेल्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या वतीने शहरातील रुग्णालयात दाखल असलेल्या गरीब व गरजू नागरिकांना महापौर निधीतून हृदय शस्त्रक्रिया, किडनी, डायलेसिस, कर्करोग, मेंदूचे आजार, अपघातग्रस्त आणि इतर मोठया शस्त्रक्रियांसाठी पाच हजार रुपयांची तुटपुंजी वैद्यकीय मदत देऊन संबंधित रुग्णांना थोडासा दिलासा दिला जातो. परंतु, महापालिकेची मुदत संपल्यानंतर निवडणूक न झाल्याने प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर महापौर निधीतून रुग्णांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीची योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक मदतीची गरज असलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महापौर नाहीत म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवाने तसे झालेले नाही.पुणे महापालिका त्यांच्या हद्दीतील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवते. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये सवलतीच्या दरात उपचार मिळतात. खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी महापालिकेकडून एक लाख रूपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते. योजनेच्या लाभार्थ्यांना पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील प्राधिकृत केलेल्या खासगी दवाखान्यांमध्ये आंतररुग्ण विभागातील केवळ जनरल वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्यांनाच आर्थिक लाभ दिला जातो. निमसरकारी, खासगी व डिलक्स रूम घेणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही.या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरपत्रकानुसार आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी लाभार्थ्याला महापालिकेतून उपचारासाठीच्या एकूण खर्चामध्ये ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी हमीपत्र घ्यावे लागते. हे हमीपत्र घेऊन खासगी रुग्णालयात दिल्यानंतर एकूण रकमेच्या केवळ ५० टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागते. उर्वरित ५० टक्के रक्कम (जास्तीत जास्त एक लाख रुपये) महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संबंधित रुग्णालयाला अदा करण्यात येते.पुणे महापालिकेची शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यंत चांगली आहे. या योजनेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वांगिण अभ्यास करावा. या योजनेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी अटी व शर्तीसह परिपूर्ण वैद्यकीय सहाय्य योजना तत्काळ सुरू करण्याची आपण कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Views: 140
Previous Post

भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार

Next Post

पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षेसाठी आमदार लांडगे सरसावले!- सण- उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकूश शिंदे यांना निवेदन

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार

पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षेसाठी आमदार लांडगे सरसावले!- सण- उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकूश शिंदे यांना निवेदन

Comments 1

  1. Sam says:
    4 years ago

    I ⅼike the helpful іnformation you provide for youjr articles.
    І wiⅼl bookmark yоur blog and take а ⅼooқ at
    again hеre regularly. I аm fairly ѕure I’ll be informed
    manby neᴡ stuff proper heгe! Good luck for thhe
    following!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!