• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 20, 2022
in Uncategorized
0
भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीभोसरी विधानसभा मतदार संघातील राज्य सरकारशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे. तसेच, भूसंपादनाचे सात प्रस्ताव प्राधान्याने येत्या महिनाभरात मंजूर करावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत पुण्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्राधान्याने भूसंपादनाचे सात प्रस्ताव तातडीने येत्या महिन्याभरात मार्गी लावावे. त्यासाठी भूसंपादन विभाग, नगर रचना विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भूमि अभिलेख विभाग यांनी समन्वय साधून तातडीने प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.आमदार लांडगे म्हणाले की, सफारी पार्क, मोशी येथील जागा पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी लवकरात-लवकर जागा मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. जागा हस्तांतरण करून, पुढील कार्यवाही करावी. तसेच, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर वाहतुकीचा ताण असल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ‘डीपी रस्ता’ व ‘पीएमआरडीए’ हद्दीतील जागेबाबत संयुक्त स्वतंत्र बैठक आयोजित करावी. ज्यामुळे मुख्य रस्त्याला समांतर रस्ता होऊन वाहतुकीचा ताण कमी करण्यात मदत होईल, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय पुढीलप्रमाणे…१: पुणे-नाशिक महामार्ग सहापदरीकरण : पुणे-नाशिक महामार्ग (रोशल गार्डन ते स्पाईन रोड व स्पाईन रोड ते इंद्रायणी नदीपर्यंत) भूसंपादन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पुढील ८ दिवसांत भूसंपादन विभागास आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्यावी. त्यानुसार भूसंपादन विभागाने पुढील १५ दिवसांमध्ये आवश्यक कार्यवाही करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत सदर कामाची निविदा प्रक्रिया सुरु होणेपुर्वी तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी. २: पुणे नाशिक महामार्गावरील औद्योगिक वसाहतींधील वाहतूक कोंडी कमी करणे : तळवडे ते मोशी या परिसरात इंद्रायणीनदीला समांतर प्रस्तावित १२ मी. रस्ता तयार करणेकामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने भूसंपादनाबाबत आवश्यक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सत्वर सादर करावा. ३: भामा आसखेड भूमिगत पाईपलाईन योजना : सार्वजनिक बांधकाम विभाग व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने संयुक्तपणे स्थळपाहणी करुन पाईपलाईनचे कामासंदर्भात येणा-या अडचणींबाबत उपाययोजना कराव्यात व त्याबाबत जिल्हाधिकारी व मा. विधानसभा सदस्य यांना अवगत करावे. ४: चिखली येथील ८०० बेडचे प्रस्तावित हॉस्पिटल : सदर हॉस्पीटलसाठी आवश्यक शासकीय गायरान जमीनीचे हॉस्पीटल वापराकरिता प्रयोजन बदलाबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. ५: इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प: पिंपरी- चिंचवड मनपा हद्दीतील इंद्रायणी नदीकाठचा भाग विकसित करणेकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीए यांनी लवकरात-लवकर प्रकल्प अहवाल तयार करुन राज्य शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात यावा. ६: यमुनानगर व दिघी भागातील रेड झोनबाबत: यमुना नगर व दिघी भागातील रेड झोन हद्द निश्चित करणेकामी जिल्हाधिकारी यांचे स्तरावर जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित करुन हद्दनिश्चितीसंदर्भात कशा प्रकारे कार्यवाही करता येईल याबाबत तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

Views: 117
Previous Post

महापालिकेच्या वतीने केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

Next Post

गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांकडे मागणी

Related Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा
Uncategorized

निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा

October 30, 2025
Next Post
गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांकडे मागणी

गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!