पिंपरी । प्रतिनिधीदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दि. १७ सप्टेंबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत २ ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत विविध सेवाकार्य करून पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि मंडलाध्यक्षांना सूचना करण्यात आल्या आहेत.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ‘सेवा पंधरवडा’ आयोजित केला असून, या कार्यक्रमांमध्ये स्थानिक खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.जिल्हा व मंडल स्तरावर पंतप्रधानांच्या जीवनावर प्रदर्शनी आयोजित करणार येणार आहे. प्रदर्शनी ‘नमो अॅप’वर डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या जनकल्याणकारी योजना व प्रशासकीय कार्यकौशल्याविषयी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांचा प्रचार-प्रसार करणार येणार आहे. ‘‘ Modi@20. Dreams Meet Delivery’’ या पुस्तकाचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.







