चकलांबा प्रतिनिधी दिः-25 पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवायाच्या दिलेल्या सुचनेनुसार चकलांबा पोलिसांच्या वतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येतं आहे. उमापूर-माटेगाव रस्त्यावर वाळू वाहतूक करणारा एक हायवा सपोनि संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर वाहने आडवी लावून ताब्यात घेतला आहे. यावेळी एका आरोपीला पकडण्यात आले असून या कारवाईत २५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी रात्री गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की एक हायवा वाळू भरून उमापूर ते माटेगाव असा जात आहे , तरी सपोनि पाटील स्वतः स्टाफ सह लागलीच मालेगाव येथे सापळा रचून बसले होते. यावेळी भरधाव वेगात हायवा येतं असल्याचे दिसतात रस्त्याच्या मध्यभागी एक दुचाकी हायवला आडवी लावण्यात आली व हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला. यावेळी गाडी मध्ये वाळूची चोरट्या मार्गाने तस्करी करण्यात येतं असल्याचे समोर आले. त्यानुसार सरफराज राजू पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक श्री. राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, पोह अमोल येळे, विनोद सुरवसे,प्रशांत घोंगडे यांनी केली.







