लहुजी शक्ती सेनेची गेवराई तालुका कार्यकारणी जाहीर
गेवराई (प्रतिनिधी) लहुजी शक्ती सेनेची नुसतीच बैठक पार पडली यामध्ये गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर करून गेवराई तालुका अध्यक्षपदी केकत पांगरी गावचे धडाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब साबळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आले आहे. या बैठकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, व लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीचा प्रारंभ करण्यात आला.वर्गवारी आरक्षणासाठी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन उपोषण व न्यायालयीन मार्गाने लढा यशस्वी झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अ ,ब क,ड प्रमाणे वर्गवारीची अमलबजावणी होण्याच्या मागणीसाठी संघटना प्रयत्नशील आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे व प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असल्याचे बैठकीत स्पष्ट करून उपस्थित प्रमुख वक्त्यांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी रस्त्यांवर उतरण्याचा इशारा दिला.गेवराई लहुजी शक्ती सेनेच्या तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब साबळे यांची नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली केकत पांगरी गावचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची बीड जिल्हा भरात ओळख आहे त्यांनी केलेल्या आंदोलन व उपोषणामुळे अन्यायाविरुद्ध लढा भरण्याची ताकद एका सामान्य कुटुंबातील लढवय्या असलेल्या बाळासाहेब साबळे या तरुणात आहे बाळासाहेब साबळे सारख्या तरुणाने गेल्या अनेक वर्षापासून संघटना चळवळीत प्रामाणिकपणे आणि इमानदारीने काम केले आहे या कामाची पावती म्हणून समाज बांधवांनी त्यांच्यावर विश्वासाची धुरा समर्थपणे दिलेली असल्याचे अनेक वेळा अनुभवायला मिळाले. चळवळीतल्या त्याच्या कार्यकर्त्याला अखेर विष्णू भाऊ कसबे यांनी न्याय दिल्यामुळे गेवराई तालुक्यात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या गेवराई तालुक्यात धडाकेबाज एन्ट्रीने अनेकांच्या भवया उंचावल्या आहेत तसेच लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब व तसेच कैलास दादा खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुका अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली असून त्यांना पुढील राजकीय कार्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. पुढे बोलताना नवनिर्वाचित तालुकाप्रमुख म्हणाले की लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब हे या देशांमध्ये समाजासाठी अहोरात्र चळवळीचे काम करत आहेत क्रांती गुरु लहुजी साळवे अण्णाभाऊ साठे -फुले -शाहू आंबेडकर सर्वसामान्य पर्यंत विचार रुजवण्याचे काम लहुजी शक्ती सेना करत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.







