• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

मराठी भाषा समन्वय अधिकारी’ म्हणून विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची नियुक्ती

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 15, 2025
in आपले शहर
0
मराठी भाषा समन्वय अधिकारी’ म्हणून विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची नियुक्ती
0
SHARES
5
VIEWS

पिंपरी, १४ जानेवारी २०२५*:- मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार तसेच विकास करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशान्वये महापालिका स्तरावर विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची ‘मराठी भाषा समन्वय अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या अंमलबजावणीसाठी समन्वय अधिका-यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून मराठी भाषा अधिकृत राजभाषा असल्याने महापालिकेच्या वतीने या भाषेचा प्रचार प्रसार विविध स्तरांवर करण्यासाठी ‘मराठी भाषा समन्वय अधिकारी ‘ म्हणून जबाबदारी विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार, व विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षण व प्रशासकीय कामकाजाचेच नाही तर सर्व लोकव्यवहाराचे जास्तीत जास्त मराठीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी संवाद, संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन व्यवहारक्षेत्र निहाय शिफारसी अंतर्भूत असलेले मराठी भाषा धोरण शासनाच्या मराठी भाषा विभागाने दि. १४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने आगामी काळात मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण मराठी माध्यमात उपलब्ध करुन देणे, मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सर्वसामान्यांना समजेल अशा प्रशासकीय व्यवहाराची मराठी भाषा विकसित करणे, बोली भाषांचे जतन व संवर्धन तसेच मराठी भाषेला राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर महत्वाची भाषा म्हणून प्रस्तापित करणे आदी उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने या धोरणामध्ये शिफारसी प्रस्तावित केलेल्या आहेत. मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून मराठीतून कामकाज सक्षमपणे व अधिकाधिक परिणामकारकरित्या करण्यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असते. याकरिता प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना “मराठी भाषा दक्षता अधिकारी” म्हणून नेमण्यात आले आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कार्यालयीन व्यवहार, सरकारी दस्तऐवज आणि दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करून मराठी भाषेच्या वापराबाबत असलेल्या सरकारी धोरणांची अंमलबजावणी देखील सुनिश्चित केली जाणार आहे. मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करणा-या उपक्रम आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देऊन मराठी भाषेचा प्रभावी वापर सुनिश्चित करून तिचे संवर्धन करण्याचा महापालिकेचा मानस असून समन्वय अधिकाऱ्यांमार्फत ही जबाबदारी पार पाडली जाणार आहे.शासकीय पातळीवर आणि नागरिकांमध्ये मराठी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर मराठी साहित्य, कला, आणि संस्कृतीला पाठिंबा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. महापालिका कर्मचारी आणि अधिका-यांना मराठी भाषेतील कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून मराठी भाषेतील लेखन, अनुवाद, आणि अभिव्यक्तीसाठी साधने देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. महापालिका कार्यालयातील मराठी भाषेतील लेखन आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या अंमलबजावणीसंबंधी नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांची माहिती कर्मचा-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. तसेच महानगरपालिका कार्यालयांमध्ये मराठीचा वापर होत आहे की नाही याची तपासणी देखील समन्वय अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे. याशिवाय स्थानिक भाषा संघटनांशी समन्वय साधून मराठी भाषा संवर्धनासाठी देखील महापालिका प्रयत्न करणार आहे.

Views: 104
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते दिनेश कुऱ्हाडे यांच्या वाढदिवसा निमित्त बालाजीनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन..

Next Post

अवैध सावकारांवर कडक कारवाई करणेचे पोलीस आयुक्तांचे आदेश

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
अवैध सावकारांवर कडक कारवाई करणेचे पोलीस आयुक्तांचे आदेश

अवैध सावकारांवर कडक कारवाई करणेचे पोलीस आयुक्तांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!