पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी)राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, अल्पसंख्यांक विकास महासंघ, अखिल वाल्मिकी समाजाने राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे.राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश नागोसे यांनी पाठिंब्याचे पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना दिले. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला आहे. त्याला आमदार अण्णा बनसोडे यांनी चांगली साथ दिली आहे. भविष्यात शहराचा आणखी विकास करण्यासाठी आम्ही पाठिंबा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. अल्पसंख्यांक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रफिक कुरेशी यांनी आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. महायुतीचे सरकार आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांसाठी काम होईल, असा विश्वास असल्याने आपण पाठिंबा देत असल्याचे कुरेशी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.अखिल वाल्मिकी समाजाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष राकेश राजोरिया यांनी पाठिंबाचे पत्र दिले आहे.