तानाजी नगर, सुदर्शन नगर येथे प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, पुणे (दि. १८ नोव्हेंबर २०२४) महायुतीचे पिंपरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार आमदार आण्णा बनसोडे यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना आणि अखिल वाल्मिकी समाज यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, सचिव जयंत कड यांनी आ. बनसोडे यांना भेटून पाठिंब्याचेपत्र दिले. यावेळी सहसचिव प्रवीण लोंढे, खजिनदार संजय गोवले प्रचिती प्रमुख विजय खळतकर संचालक संजय ववले, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, विनोद मित्तल, प्रमोद राणे, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक आदी उपस्थित होते. तसेच अखिल वाल्मिकी समाजाच्या वतीने ही आ. आण्णा बनसोडे यांना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राकेश सामले राजुरिया यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी माजी अध्यक्ष राजू परदेशी, शेखर बेलपत्तर, अशोक वाल्मिकी, धरमविर राणा,अशोक वाल्मिकी, धमपत बेनवाल, रोहिदास कुडिया आदी उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार आण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ चिंचवड गावातील तानाजी नगर, सुदर्शन नगर परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रसाद शेट्टी, शितल शिंदे, जगन्नाथ साबळे, जयश्री गावडे, शैलेश मोरे, राजेंद्र साळुंखे, निलेश पांढरकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फजल शेख, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी महेश कुलकर्णी, निलेश डोके, दीपक मेवाणी आदींनी पदयात्रेत सहभाग घेऊन प्रचार पत्रके वाटली. एवढी उमेदवार आमदारांना बनसोडे यांनी बुधवारी (दि.२०) मतदाना दिवशी घड्याळ चिन्ह पुढील क्रमांक एक चे बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.