• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

नागरिकांनी ठरवलंय परिवर्तन करायचे, एकाधिकारशाही मुळापासून संपवायची- रोहित पवार

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 8, 2024
in आपले शहर
0
नागरिकांनी ठरवलंय परिवर्तन करायचे, एकाधिकारशाही मुळापासून संपवायची- रोहित पवार
0
SHARES
36
VIEWS

सर्व्हे सांगतोय; भोसरीत बदल निश्चित आहे

येथे लोकप्रतिनिधी नाही ताबा गॅंग कार्यरत – रोहित पवार

भोसरी 8 नोव्हेंबर : परिवर्तन करायचे हे नागरिकांचे ठरलेले आहे. लोकांमध्ये आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांचे मत आले की येथे लोकप्रतिनिधी नसून ताबा गँग कार्यरत आहे. येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात चालते. फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना मदत करून ठेके मिळवायचे, त्यातून पैसा मिळवायचा एवढेच कुठेतरी चालू आहे. त्यामुळे परिवर्तन हे नागरिकांनी ठरवले आहे. एकाधिकारशाही मुळापासून संपवायची आहे असे आमदार रोहित पवार भोसरी येथे म्हणाले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार भोसरी येथे गुरुवारी बोलत होते. अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी रोहित पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झालेले माजी नगरसेविका सारिका लांडगे आणि संतोष लांडगे यांची भेट घेतली. शिवसेनेचे रवी लांडगे यांच्याशी रोहित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली भोसरीतील राजकीय समीकरणे, मिळत असलेला प्रतिसाद ज्येष्ठ जुन्या पदाधिकाऱ्यांशी रोहित पवार यांनी चर्चा केली. यानंतर भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी रोहित पवार म्हणाले, भोसरी मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला जो ऑन ग्राउंड होता. सोशल मीडिया तसेच कॉलिं चा आधार घेऊन करण्यात आला होता. ज्यामध्ये अजित गव्हाणे यांचे नाव पुढे आले आहे. सुसंस्कृत उच्चशिक्षित म्हणून अजित गव्हाणे यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांची पसंती मिळत आहे. भोसरीतील आमदारांच्या एकाधिकारशाही, आपल्याच लोकांना पुढे करत महानगरपालिकेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, ठेके मिळवण्यासाठी दबाव पद्धती याला सर्व कंटाळले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण परिवर्तनाच्या मनस्थितीत आहे.मतदारसंघातील अडचणी लक्षात न घेता सामान्य लोकांच्या गरजा लक्षात न घेता केवळ आपल्या हिताचे पाहिले जात आहे. त्यामुळे अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून नागरिकांनी परिवर्तन करायचे ठरवले आहे. ज्याला भोसरी परिसरातील प्रत्येक घटकाची साथ मिळत आहे.सामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी एक चांगला प्रतिनिधी म्हणून अजित गव्हाणे एक चांगला पर्याय आहेत

त्यांच्या पाठीमागे लोक उभे राहतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

भोसरी मतदारसंघांमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाची साथ हीसगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याबद्दल सुलभा उबाळे, रवी लांडगे तसेच तमाम शिवसैनिकांचे मनापासून आभार रोहित पवार यांनी व्यक्त केले. भोसरी मतदारसंघांमध्ये प्रत्येक जण मन लावून काम करत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा विजय निश्चित आहे. असे देखील रोहित पवार म्हणाले.

गरीब माणसासाठी काय करता ते दाखवा – रोहित पवार*कुठेतरी उत्तर प्रदेशचा प्रभाव महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांवर झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र एक पुरोगामी विचाराची भूमी आहे. महाराष्ट्र धर्म आपल्याला जपायचा आहे . बटेंगे कटेंगे अशी जी काही वक्तव्य येत आहेत ती गुजरात, उत्तर प्रदेश वरून आलेली वाक्य आहेत. हे गुजरातशाही महाराष्ट्रावर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाच्या नेत्यांना आम्हाला एवढेच सांगायचे आहे. आम्ही मराठी माणसे आहोत. ही संतांची भूमी आहे. आमचे विचार पुरोगामी आहेत. आजच्या भाजपच्या याच धर्माच्या चक्रव्यूहामध्ये गरीब माणूस अडकलाय. त्या गरीब माणसाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. याबद्दल तुम्ही काय करता ते दाखवा असे रोहित पवार म्हणाले…………….” माझ्या मूळ स्वभावावर मी येईल” अशी वक्तव्य भाजपच्या उमेदवारांनी करणे म्हणजे तुम्ही स्वतःच्या तोंडून लोकांना सांगताय की तुमचा मूळ स्वभाव काय आहे. मुळात आम्ही सगळे परिवर्तनाची भूमिका समोर ठेवून एकत्र आलेलो आहोत. आज केवळ मी उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात नाही.तर आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे. माझा प्रत्येक सहकारी, पक्षातला पदाधिकारी हा परिवर्तनाच्या मानसिकतेमध्ये आहे. ज्या पद्धतीने त्यांनी काल भाषण केले ते लोकांना आवडणारे नाही. विरोधकांची वक्तव्य पराभवाच्या नैराश्यातून पुढे येत आहेत. त्यांच्या वक्तव्यातून त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे ते अशी वक्तव्य करत असतील. अजित गव्हाणे

Views: 121
Previous Post

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

Next Post

सत्ताधाऱ्यांना दिघीतील नागरिकांकडे मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? – अजित गव्हाणे

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
नागरिकांनी ठरवलंय परिवर्तन करायचे, एकाधिकारशाही मुळापासून संपवायची- रोहित पवार

सत्ताधाऱ्यांना दिघीतील नागरिकांकडे मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? - अजित गव्हाणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!