प्रतिनिधी पूणे दि. १२ मार्च २०२४ पूण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते वसंत मोरे यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केलाच. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे नाराज होते. वेळोवेळी सभा व पक्षाच्या कार्यक्रमात दूय्यम स्थान मिळत असल्याने काल संध्याकाळी मोरे यांनी फेसुबक पोस्ट केली ती चांगलीच चर्चेत आली. “एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो” असं वसंत मोरे यांनी पोस्ट मध्ये लिहिले होते. त्यामुळे मोरे हे पक्षात नाराज असल्याचे पुन्हा दिसून आले. आता पुन्हा वसंत मोरे यांनी पोस्ट करून साहेब मला माफ करा असं म्हणत मनसेला राम राम केला आहे. पूढे ते कोणत्या पक्षाचा मार्ग धरतात हे पाहावे लागेल यावर त्यांचे पूढील भवितव्य ठरणार आहे.