• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

२० लाखाची लाच मागणाऱ्या देहूरोड पोलीसांना तात्काळ निलंबित करा-अपना वतन संघटना…..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
February 17, 2024
in आपले शहर
0
२० लाखाची लाच मागणाऱ्या देहूरोड पोलीसांना तात्काळ निलंबित करा-अपना वतन संघटना…..
0
SHARES
43
VIEWS

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ फेब्रूवारी २०२४ वीस लाखाची लाच मागणाऱ्या देहूरोड स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करून , तात्काळ निलंबित करण्याची मागणी अपना वतन संघटनेने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहेत . अपना वतन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पोलीस हे कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी २४ तास अहोरात्र झटत असतात. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. परंतु देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत मागील अनेक दिवसांपासून नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. ज्यामध्ये पोलिसांच्या संगनमताने अवैध धंदे चालवणे, खोटे गुन्हे दाखल करणे, सामान्य नागरिकांची तक्रार न घेणे, सामान्य नागरिकांशी उद्धट वागणे व अपमानजनक वागवणूक देणे. केवळ राजकीय दबाव व काही आर्थिक स्वार्थासाठी जबाबदारीची जाणीव असताना जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर कृत्य करणे व अशा कृत्यांना अभय देणे. यासंदर्भात अपना वतन संघटनेने वरिष्ठ अधिकारी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणार नाहीत. चुकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळीच लगाम घालतील अशा अपेक्षेने अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु आजतागायत ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये एका नागरिकांकडून २५ लाख रुपयाचे चेक लिहून घेतलेले प्रकरण ताजे असतानाच आज वृत्तपत्रांच्या माध्यमातून देहूरोड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी २० लाख रुपयाची मागणी करीत खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिल्याबाबत धक्कदायक बातमी शहरभर पसरलेली आहे. यामुळे पोलीस दल प्रचंड बदनाम होत आहे. घडलेली घटना अशी कि, दिनांक १५/०२/२०२४ रोजी देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत २० लाख रुपयाची लाच मागण्यात आली. याबाबत गुन्हा क्रमांक ७९/२०२४ दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये वैभवसिंग मनीषकुमार सिंग वय १९ , रा . किवळे , पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटल्याप्रमाणे, देहूरोड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी व इतर ६ जणांनी फिर्यादी वैभव सिंग यांच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी १० फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता किवळे येथील एका कॅफेमधून वैभव सिंग यांचे अपहरण केले. तेथून मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम, आणि तेथून देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले . वैभव सिंग याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली. देहूरोड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी व इतर आरोपींची वैभवसिंग यांना घाबरवून, धमकावून त्यांच्याकडून गूगल पे आणि नेट बँकिंग द्वारे ४ लाख ९८ हजार रुपये घेतलॆ आहेत असे फिर्यादी मध्ये नमूद आहे. सदर घटना पोलीस दलासाठी अतिशय शरमेची बाब आहे. अशा पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनसुद्धा पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त असे वरिष्ठ अधिकारी अशा प्रकरणाची चौकशी करून अशा भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. देहूरोड पोलीस स्टेशन मधील सदर पोलीस कर्मचारी व त्यांच्या माघे आडून त्यांना हे करायला लावणारे वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी करावी. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय एवढे गंभीर प्रकरण कनिष्ठ कर्मचारी हाताळत असतील असे वाटत नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपण तात्काळ दोषी पोलिसाना अटक करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केलेली आहे. सदर विषया बाबत कारवाई झाली नाही तर “अपना वतन संघटनेच्या” वतिने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

Views: 131
Previous Post

जेष्ठ पत्रकार श्री.निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन..

Next Post

मोरवाडी कोर्ट मागील भंगारमालाच्या गोदामाला लागली मोठी आग..

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
मोरवाडी कोर्ट मागील भंगारमालाच्या गोदामाला लागली मोठी आग..

मोरवाडी कोर्ट मागील भंगारमालाच्या गोदामाला लागली मोठी आग..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!