• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व १२८ शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 20, 2023
in आपले शहर
0
शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व १२८ शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’
0
SHARES
8
VIEWS

पिंपरी, दि. २० सप्टेंबर २०२३:- शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व १२८ शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचा भार हलका झाला असून अभ्यासाव्यतिरिक्त नवनवीन गोष्टी शिकण्याचा उत्साह त्यांच्यामध्ये बळावला आहे. आता प्रत्येक शनिवारी महापालिकेच्या शाळांमधील वर्ग जल्लोषाने गजबजून जातात. शनिवार जो शाळेचा दिवस असतो तो आता गीत, कविता, गायन, प्रश्नमंजुषा, शाब्दिक खेळ, पाककला, चित्रकला, मैदानी खेळ अशा विविध उपक्रमांनी भरलेला आहे. ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा तसेच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण करणारा आहे.या उपक्रमामुळे महापालिका शाळा कल्पकतेचे केंद्र बनल्या असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कलेत प्रभुत्व मिळवत आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला तसेच पर्यावरणपूरकतेला या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची शाळा उपस्थितीची गोडी वाढेल आणि आठवड्याभराच्या शारिरिक, मानसिक त्रासातून मुक्तता मिळेल. महापालिका शाळांमध्ये या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून काही विद्यार्थी पाककलेचे धडे घेत आहेत. तसेच पाककलेसोबत त्यांना टीमवर्कचे महत्त्वही समजत आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना बागकाम तसेच रोपांची लागवड करणे शिकविले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल मौल्यवान ज्ञान तर प्राप्त होत आहेच पण त्यांच्यामध्ये जबाबदारी आणि संयमाची जाणीवही निर्माण होत आहे. ‘दप्तराविना शाळा’ उपक्रमाने विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाबाहेरील त्यांच्या आवडी जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. नृत्य, संगीत, चित्रकला किंवा नाटक यांसारखे कलात्मक उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांची वेगळी बाजू आत्मसात करण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिभेला जोपासण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. आयुक्त शेखर सिंह म्हणाले, दप्तराविना शाळा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता तर वाढलीच आहे पण त्यांच्या कौशल्यालाही वाव मिळाला आहे. पालक आणि शिक्षकांनीही या अग्रेसर विचारसरणीचे कौतुक केले आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना जड दप्तरांच्या शारीरिक ओझ्यापासून मुक्ती तर दिलीच पण त्यांचा मानसिक भारही हलका केला आहे. जिज्ञासा आणि जीवन कौशल्ये यावर भर देऊन महापालिका शाळा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेशीपलीकडे सतत विकसित होत असलेल्या धावपळीच्या जगात पाऊल ठेवण्यास मदत करत करतील असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी बोलताना व्यक्त केला.

Views: 121
Previous Post

ए. आय. मुळे रोजगार, उद्योगाच्या नवीन संधी – डॉ. दीपक शिकारपूरपीसीयुमध्ये आयटीतील विविध संधींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचा संदेश- भर पावसात भाविक, साधकांचा लाखोंच्या संख्येने सहभाग

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचा संदेश- भर पावसात भाविक, साधकांचा लाखोंच्या संख्येने सहभाग

शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचा संदेश- भर पावसात भाविक, साधकांचा लाखोंच्या संख्येने सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!