आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वनप्रकल्प विभाग, पुणे यांच्या वतीने देहूरोड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच माझी वसुंधरा आणि पंचप्रण शपथ घेण्यात आली. याप्रसंगी देहूरोड येथील छावणी परिषदेचे सीईओ अमितकुमार माने, उप आयुक्त रविकिरण घोडके, वनप्रकल्प, पुणेच्या विभागीय व्यवस्थापक सारिका जगताप, वनप्रकल्प विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक गणेश गुरव, माजी नगरसेवक सचिन चिखले, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आरएफओ प्रज्ञा कावरे, सहा. उद्यान अधिक्षक राजेश वसावे, ज्ञानदीप विद्यालय, अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालय, तळवडेचे विद्यार्थी व शिक्षक, रुपीनगर क्रिकेट क्लब, गो ग्रीन वृक्ष संवर्धन संस्थेचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.






