• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

शिक्षक दिनानिमित्त आयुक्त आणि विद्यार्थ्यांनी केली भूमिकांची अदलाबदल

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 4, 2023
in आपले शहर
0
शिक्षक दिनानिमित्त आयुक्त आणि विद्यार्थ्यांनी केली भूमिकांची अदलाबदल
0
SHARES
8
VIEWS

पिंपरी, दि. ४ सप्टेंबर २०२३- पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांची दिव्याची गाडी आली. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून महापालिका शाळेतील दोन विद्यार्थी उतरले. त्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वार तसेच आयुक्त कार्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सॅल्युट केले. हे दृश्य होते आज महापालिका आयुक्तांची भूमिका बजावणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागताचे.

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आज एक अनोखा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणी नगर प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी करण काकडे आणि काळेवाडी येथील दत्तोबा रामचंद्र काळे शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थीनी अपेक्षा माळी या दोघांनी महापालिका आयुक्तांची भूमिका केली. यावेळी त्यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक देखील घेऊन सूचना केल्या. बैठकीस सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

यानंतर दोन्ही विद्यार्थी आयुक्तांनी संत तुकाराम नगर येथील अग्निशमन केंद्राला भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते, अग्निशमन विभागाची जनतेला कशी मदत मिळते याबाबत प्रात्याक्षिक पाहिले, तसेच तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली.

एकीकडे विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्त म्हणून भूमिका केली तर दुसरीकडे आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये जावून शिक्षकाची भूमिका पार पाडली. या अनुभवाबाबत बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘जॉब स्विच’ या उपक्रमांतर्गत मी आज एका शिक्षकाची भूमिका पार पाडली तर विद्यार्थ्यांनी माझ्या कार्यालयात जाऊन आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली. महापालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेत शिकवत असताना मी चांद्रयानाबद्दल माहिती दिली. विद्यार्थी भविष्यात इस्रोचा एक भाग कसे बनू शकतात आणि वैमानिक अभियंता कसे होऊ शकतात याबद्दल त्यांनी मला प्रश्न विचारले. विशेषतः मुलींना हे करिअर स्वीकारण्याची आवड आहे हे पाहून मला आनंद वाटला. आकांशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी माझे शिक्षण, छंद, आवडते शिक्षक यांसारखे काही वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना मला खूप आनंद झाला असे सांगून या अनुभवाने मलाही विचार करण्यासारखे काही प्रश्न जाणवले जेणेकरून शहरातील एकूण शिक्षण पद्धतीवर काय बदल करता येतील याबाबत मला काही कल्पना सुचल्या असल्याचे आयुक्त सिंह म्हणाले.

Views: 131
Previous Post

आपघात ग्रस्त पती पन्ती च्या मदतीला करुणा मुंढे आल्या धाऊण

Next Post

आम्ही बाबरी पाडू शकतो; तर पुण्येश्वरावळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो’’!

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
आम्ही बाबरी पाडू शकतो; तर पुण्येश्वरावळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो’’!

आम्ही बाबरी पाडू शकतो; तर पुण्येश्वरावळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो’’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!