तलवडा प्रतीनीधी तुळशीराम वाघमारे यांच्याकडून आ
दारूबंदी अधिकारी लक्ष देतील का ?
गेवराई तालुक्यातील तलवाडा – आंतरवाली रोड वर असलेल्या शुभम बियरबार आणि परमिट रूम वर दारूबंदी कायद्याचे सर्रास उलंघन होत असून बियर बार चे लायसन्स असताना देशी दारू ची ही विक्री मोठ्या होत आहे तसेच त्या ठिकाणी परमिट रूम च्या नियमात बसेल अशी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे का दुर्लक्ष करत आहेत का प्रश्न उपस्थित होत आसुन संबधित बियारबार वर दारूबंदी अधिकारी कार्यवाही करतात का ह्या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील आंतरवाली रोडवर असलेल्या शुभम बिअरबार आणि परमिट रूम वर दारूबंदी कायद्याचे सर्रास उलघन होत असल्याचे निदर्शनास येत असून परमिट रूम वर देशी दारू ची विक्री करन्यात येते,या देशी दारू संबधी तलवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यवाही करन्यात आली असून दारूबंदी अधिकारी मात्र थातूर् – मातुर कार्यवाही करून मोकळे होताना दिसतात हा प्रकार अत्यंत निंदनीय आसुण सदरील बियरबार चां परवाना रद्द करावा याकडे दारूबंदी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्ष देवून तत्काळ कार्यवाही करावी.
1) परमिट रूमवर शौचालय आणि मुतारी नाही…
बियरबार च्या नियम आणि अटीच्या नियमानुसार परमिट रूम आणि बार वर फॅमिली साठी शौचालय आणि लघुशंखे साठी मुतारी ची आवश्यकता अस्तांना तेथे कसलीच सुविधा नसून ही दारूबंदी चे अधिकारी तपासणी साठी आल्यावर पाहणी नकरता कानाडोळा करतात.
2) आठरा वर्षा खालील मुले हॉटेल वर कामाला …
हॉटेल वर नाबालीक मुले कामाला ठेवून बालकामगार कायद्या नुसार शिक्षेस पात्र ठरत असताना तपासणी करण्यास आलेले अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात ? हा प्रश्न उपस्थित राहतो ,या ठिकाणी काम करणारे मजूर हे बालमजूर असून त्यांच्या कडून काम करवून घेण्यास परमिट रूम चालक चतुर आहे त्यांचे शोषण करत त्यांच्या कडून स्वतःचे वैयक्तिक काम करवून घेत त्यांना दमदाटी करतांना अनेकानी सांगितले याकडे बालमजूर संरक्षण समिती यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे