• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पाच दिवसीय कार्यक्रमांचे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 31, 2023
in आपले शहर
0
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पाच दिवसीय कार्यक्रमांचे
0
SHARES
10
VIEWS

पिंपरी, दि. ३० जुलै २०२३ :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पाच दिवसीय कार्यक्रमांचे तसेच पर्यावरणपूरक शहरासाठी ५०० झाडांचे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या विचार प्रबोधन पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.दि. १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधी दरम्यान निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानका शेजारील प्रांगणात विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृक्षारोपण, परिसंवाद, किर्तन, वाद्यांची जुगलबंदी, कविसंमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांची प्रमुख उपस्थिती असेल.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचार प्रबोधनपर्वानिमित्त आयोजित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वात विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता निगडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास आयुक्त सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात सकाळी पारंपरिक सनई वादनाने करण्यात येणार आहे. विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी सकाळी १०:३० वाजता विविध हलगी पथकाद्वारे “हलगी वादनाची जुगलबंदी” सादर केली जाणार आहे. सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचा “स्वरचंदन” हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.३० वाजता वेदांग महाजन हे “जागर ,महापुरुषांच्या विचारांचा” हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी २ वाजता विविध बँड पथकांमध्ये “बँड स्पर्धा” रंगणार आहे. दुपारी ४ वाजता अनिकेत जवळेकर यांचा “सुवर्ण लहरी” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ५ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा “लोकशाहीर आणा भाऊ साठे व आद्यक्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर आधारित समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता बापूराव पवार यांचा “लेखणीचा बादशहा” हा प्रबोधनपार गीतांचा कार्यक्रम होणार असून रात्री ८ वाजता विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता कुणाल कांबळे यांच्या ‘अण्णा तुमच्यासाठी’ हा प्रबोधनात्मक गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने होणार आहे.२ ऑगस्ट रोजी विचार प्रबोधन पर्वाच्या दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता सुजित रणदिवे यांचा “सनई आणि सुंदरी यांची जुगलबंदी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता पल्लवी घोले व अमर शेख यांचा “अण्णांची गौरव गाथा तसेच शाहीरी जलसा” हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम राहूल शिंदे, विजय सरतापे व शामल धिमधिमे हे सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये १ वाजता इंडियन आयडॉल फेम, अमोल सकट व ज्योती अवघडे यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता वर्षा पवार यांचा मराठी लोकगीते, प्रबोधनात्मक गीते हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील मानवतावादी वैचारिक दृष्टीकोन या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये विवेकवादी विचारवंत, अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, संपादक – साप्ताहिक विवेक, मुंबई रविंद्र गोळे, प्रा.डॉ. मिलिंद आव्हाड, जेएनयु, डॉ. धनंजय भिसे, कामगार आयुक्त, पुणे, सतिश देशमुख, प्रा. प्रदिप कदम, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार हनुमंत पाटील, अशोक पालके हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५.४० वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रवादाची प्रेरणा या विषयावर ज्येष्ठ विचारवंत, डॉ. रमेश पांडव यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कोमल पाटोळे प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. रात्री ८ वाजतागणेश गायकवाड यांच्या “सांस्कृतिक कार्यक्रमाने” प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता किर्तनकार – ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर “प्रबोधनात्मक किर्तन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता शांताबाई फेम, संजय लोंढे व प्रभू जाचक यांचा “प्रबोधनात्मक गीते” –हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० वाजाता न्यू होम मिनिस्टर फेम, रमेश परुळेकर यांचा खेळ रंगला पैठणीचा तीन प्रमुख बक्षीस समाविष्ट असा विशेष महिलांकरिता कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर सिने अभिनेत्री गुरुमित कौर यांचे “महिला मार्गदर्शनपर व्याख्यान” आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता अक्षय डाडर व लखन अडागळे हे “सांस्कृतिक कार्यक्रम” सादर करणार आहेत.दुपारो २.३० वाजता छाया मोरे आणि पार्टी यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि वंचित समाज विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र, पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेजचे डॉ. आनंद काठीकर, वाडिया कॉलेजच्या डॉ. वृषाली रणधीर, डॉ. बबन जोगदंड, यशदा, पुणे व संदिपान झोंबाडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी सायं. ५.३० वाजतासंगीतमय रामलिंग जाधव यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७. वाजता वर्षा रायकर यांचा पारंपरिक लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता राजू जाधव व रविंद्र खोमणे यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात सकाळी ९.३० वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता सारिका नगरकर यांचा “प्रबोधनपर लोकगीतांचा कार्यक्रम” होणार आहे. त्यांनतर सकाळी १२.३० वाजता भिम ज्योती परिवर्तन सांकृतिक मंडळ, बीड, छाया कोकाटे या “वंदन करू आण्णा भाऊंना” गीत गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारच्या सत्रात २ वाजता मयूर खुडे “ही चंद्राची चांदणी” हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी. ३.३० वाजता शामसन चंदनशिवे व राजु डेव्हिड यांचा “गौरव आण्णाचा” सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजत्ता उद्योजकता कार्यशाळा अंतर्गत विविध मान्यवरांसमवेत संवाद विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादामध्ये पुण्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, व्यवस्थापकीय संचालक. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंडळचे अनिल म्हस्के, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे, जिल्हा व्यवस्थापक, खादी ग्राम उद्योग, महापालिकेचे समाज विकास अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता सुरेश पंचरास यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार असून रात्री ८.३० वाजता विचार प्रबोधन पर्वाच्या चौथ्या दिवसाची सांगता सिने कलाकार राधिका पाटील आणि सहकारी यांच्या “लोकगीताच्या कार्यक्रमाने” होणार आहे.दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता किसन गायकवाड व विजय साळवे यांचा “पारंपरिक वाद्यवादन” कार्यक्रम व उत्तम बिरगणे, शिराळा, कोल्हापूर यांचा “हलगी वादन” कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. सकाळी ९.३० वाजता डॉ. सचिन परब यांचे “व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन” व्याख्यान असणार आहे. सकाळी १०.३० वाजता शाहीर काशिनाथ उबाळे व मोहम्मद शेख यांचा लोकगीतांचा कार्यक्रम” होणार आहे. सकाळी. ११.३० वाजता सुरेश रंजवे यांचा “प्रबोधनपर गीते” कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ वाजतासोनाली संजय फलफले यांचा स्वराधीन -रंगमंच मराठी कलेचा,कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता पोतराज ते डॉक्टर डॉ. धर्मराज साठे यांची विशेष मुलाखत मुलाखतकार शिवाजी घोडे, पत्रकार हे हे घेणार आहे. सायंकाळी ३ वाजता अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाचे फायदे व तोटे ? विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादामध्ये लोकमत वृत्तपत्राचे राज्य संपादक संजय आवटे, केशव शेकापुरकार, डॉ. सुशीलकुमार चिमुरे, भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता निलेश देवकुळे यांचा “प्रबोधनपर गीतांचा” कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजतास्वाती पुणेकर यांचा “लोकगीतांचा भव्य कार्यक्रम” कार्यक्रम होणार असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२३ या ५ दिवसीय कार्यक्रमाची सांगता रात्री ८.३० वाजता सिने कलाकार श्रीम.प्राजक्ता महामुनी आणि श्रीम. दिप्ती आहेर यांच्या लोकगीताचा भव्य कार्यक्रमाने होणार आहे.महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार असून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व निमित्त ५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, सचिव नितीन घोलप, कार्याध्यक्ष सचिन दुबळे तसेच माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे या कार्यक्रमास सहकार्य असणार आहे.महिलांसाठी खेळ पैठणीचा ह्या कार्यक्रमाबरोबरच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी स्त्री-रोग तज्ञाचे मार्गदर्शन लाभणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज विकास विभाग तसेच लाईट हाऊस च्या सहकार्याने महिलांना उद्योजकता प्रशिक्षण व रोजगारासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना उच्च तसेच परदेशी शिक्षणाच्या संधी, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना अशा विविध योजनांवर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

Views: 153
Previous Post

१ ऑगस्ट रोजी शहरातील वाहतुकीत बदल

Next Post

भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना निगडी येथे हलगी वाजवून अभिवादन करण्यात आले.

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना निगडी येथे हलगी वाजवून अभिवादन करण्यात आले.

भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना निगडी येथे हलगी वाजवून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!