• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

हेड – करसंकलन विभागाची वजनदार कामगिरी; 120 दिवसांत 500 कोटींची उच्चांकी वसुली !

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 30, 2023
in Uncategorized, आपले शहर
0
हेड – करसंकलन विभागाची वजनदार कामगिरी; 120 दिवसांत 500  कोटींची उच्चांकी वसुली !
0
SHARES
0
VIEWS

सब हेड- कर संकलनाचा “पीसीएमसी पॅटर्न” यशस्वीसब हेड- गतवर्षीच्या तुलनेत 210 कोटींची अधिक वसुली

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीत चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये चांगलीच भरारी घेतली आहे. एप्रिल ते जुलै या गेल्या चार महिन्यातच कर संकलन विभागाने तब्बल 500 कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) मध्ये एप्रिल ते जुलै या चार महिन्यात फक्त 287 कोटींची वसुली झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराची वसुली तब्बल 210 कोटींनी जास्त झाली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या कर वसुलीच्या या नव्या ‘पॅटर्नची’ चर्चा सुरू झाली आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा करआकारणी व करसंकलन विभाग गेल्या वर्षभरापासून सातत्याने वसुलीचे नवनवीन विक्रम करीत आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी जास्तीत-जास्त मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने एक पॅटर्न सुरू केलाय. त्यानुसार डेटा ॲनालिटिक्स, सोशल मीडिया जनजागृती, विविध स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन देणे, गेल्या पाच वर्षापासून महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्याची यादी काढून त्यांना जप्तीची नोटीस देणे, त्यांच्यावर जप्ती कारवाई करणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे, सिद्धी प्रकल्पातून शंभर टक्के बिलांचे वाटप आदींवर करसंकलन विभागाकडून भर दिला जातोय.

करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीतकमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले असून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या चार महिन्यातच 3 लाख 29 हजार 470 मालमत्ता धारकांनी तब्बल ५०० कोटींचा कर भरला आहे.

कर संकलनच्या पॅटर्नची चर्चा!

महापालिकेतील सर्वात आव्हानात्मक विभागांपैकी एक विभाग हा करआकारणी व करसंकलन विभाग आहे. महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्याचे मोठे या आव्हान या विभागासमोर असते. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने मागील वर्षीपासून कर वसुलीचा नवीन पॅटर्न तयार केला असून त्यामुळे कर वसूल करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. या पॅटर्नची चांगलीच चर्चा सुरू असून राज्यातील काही महापालिकेतून या पॅटर्नबाबत विचारणाही करण्यात येऊ लागली आहे.

केंद्राचे 15 व्या वित्त आयोगाचे भरघोस अनुदान मिळणार

15व्या वित्त आयोगाचे अनुदान मिळण्यासाठी केंद्राने मालमत्ता कर सुधारणा सुचवलेल्या आहेत. महापालिकांनी केलेल्या सुधारणांच्या प्रमाणात पालिकांना अनुदान मिळणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेला रोडमॅप आयुक्त शेखर सिंह यांनी गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथील कार्यशाळेत सादर केलेला आहे. त्यामुळे लोकांना मिळणाऱ्या सेवा अधिक दर्जेदार आणि वेगवान असतील. याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर 15व्या वित्त आयोगाचे भरघोस अनुदान मिळणार आहे.

आकडे बोलतात

आर्थिक वर्ष एप्रिल ते जुलै या चार महिन्यातील वसुली (कोटींमध्ये)

2019-20- 289

2020-21- 180

2021-22 220

2022-23 287

29 जुलै 2023 500

असा आला कर

ऑनलाईन – 322 कोटी 86 लाख

विविध ॲप – 5 कोटी 73 लाख

रोख – 61 कोटी 12 लाख

धनादेशाद्वारे – 44 कोटी 41 लाख

इडीसी- 4 कोटी 91 लाख

आरटीजीएस – 24 कोटी 51 लाख

कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी

औद्योगिक – 2,434

निवासी-2 लाख 91, 92

बिगरनिवासी -26 हजार 289

मिश्र-7, 625

मोकळ्या जमिन 2, 326

इतर – 3

एकूण 3 लाख 29 हजार 470

पाचशे कोटींचा नवीन माईलस्टोन गाठण्यात हातभार लावणाऱ्या जबाबदार करदात्या लोकांचे मनापासून आभार. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून करआकारणी व करसंकलन विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांचा सुद्धा या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्याकडून मालमत्ता कर वेळेवर भरण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेचे करवसुलीचे एक हजार कोटींचे उद्दीष्ट असून ते नक्की पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. हे करत असतानाच केंद्र शासनाने सूचित केल्याप्रमाणे मालमत्ता कर प्रणालीमध्ये लोकाभिमुख सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या वर्षभरात अपेक्षित सुधारणा केल्या जातील.

:- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

मालमत्ता कर वसुली करण्यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन प्रयोग करीत आहोत. करवसुलीचे एक हजार कोटींचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आमच्या विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत 500 कोटींची वसुली झाली आहे. मालमत्ताधारकांनी सुद्धा मालमत्ता कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा आम्हाला थकबाकीदारांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

– नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग

Views: 114
Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण…

Next Post

१ ऑगस्ट रोजी शहरातील वाहतुकीत बदल

Related Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
Next Post
१ ऑगस्ट रोजी शहरातील वाहतुकीत बदल

१ ऑगस्ट रोजी शहरातील वाहतुकीत बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!