• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पाणी पुरवठ्याच्या कामासाठी त्वरीत जमीन उपलब्ध करून देऊ-उपमुख्यमंत्री

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
May 15, 2023
in आपले शहर
0
ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन           पाणी पुरवठ्याच्या कामासाठी त्वरीत जमीन उपलब्ध करून देऊ-उपमुख्यमंत्री
0
SHARES
6
VIEWS

पुणे दि.१५- आकुर्डी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरीत भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शहर वेगाने वाढतांना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्वाची आहे. शहराचे सौंदर्य शाश्वत विकासात आहे असा नवा विचार अलिकडच्या काळात समोर आला आहे. नव्या १०० द.ल.लिटर जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे शहराला चांगला पाणी पुरवठा होईल. जलशुद्धीकरण केंद्राने ३०० द.ल.लिटरची क्षमता गाठल्यावर शहराची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्वाचा आहे. जलवाहिन्यांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी अडचण दूर करून आवश्यक जमीन एका महिन्याच्या आत महापालिकेला देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिली. महापालिकेने पाणी पुरवठ्याची कामे वेगाने करून पुढील दोन वर्षात मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

सांडपाण्यावर प्रक्रीया करा

पिण्याच्या पाण्याचा विचार करताना सांडपाण्यावर प्रक्रीया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रासाठी अशा पाण्याचा उपयोग करता येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सेाबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल. शाश्वत शहरांकडे जाण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल. प्रत्येक शहराला वर्षानुवर्षे साठवलेले कचऱ्याच्या डोंगरांवर प्रक्रीया करणेदेखील आवश्यक आहे. या गोष्टी वेगाने केल्यास पिंपरी चिंचवड आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल.

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. त्यामुळे या शहराकडून मोठ्या अपेक्षा आहे. शहराचे संचलन करणारी इमारत सुंदर असली पाहिजे. अशी प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहणार आहे. इमारतीसोबत काम करणारी माणसे संवेदनशील असणे महत्वाचे असते. चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणारे वातावरण नव्या इमारतीत असेल. सामान्य माणसाची कामे वेगाने होतील अशी आधुनिक सुविधांनी युक्त इमारत तयार होत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि मनुष्यबळ देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

नाट्यगृहाला गदिमांचे नाव देऊन शहराची उंची वाढली

गदिमांच्या नावाने अतिशय सुंदर सभागृह तयार केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करून श्री.फडणवीस म्हणाले, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातले ग.दि. माडगुळकरांचे नाव अमर आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आणि मराठी माणसासाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी अजरामर केली. पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला. साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे प्रचंड योगदान आहे. हिंदी चित्रपटातही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढते, ते काम आपण केले आहे.

खासदार बारणे म्हणाले, शहराची गरज ओळखून जलशुद्धीकरण केंद्र आणि तारांगणाचे काम झाले याचे समाधान आहे. नागरिकांच्या गरजेचे प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. चांगले प्रकल्प उपयुक्त ठरावेत यासाठी नागरिकांनी देखील त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.आमदार लांडगे म्हणाले, पुढील ३० वर्षाचा विचार करून शहरातील विकासकामे करण्यात येत आहेत. येत्या काळात कचऱ्याचे डोंगर सपाट करण्यात येतील. मोशी येथे २०० खाटांचे कर्करोगाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. टेनिस सोबत कुस्तीमध्येही शहरातील खेळाडू ऑलिम्पिकला जावा असे प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेसाठी ३१२ कोटींची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. ही ग्रीन इमारत असणार आहे. शहराची ओळख सांस्कृतिक नगरी व्हावी यासाठी ग.दि.माडगूळकर सभागृह ६७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही महापालिकेने गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहे. शहरात आरोग्य सुविधेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाला सुरू करण्यात आला आहे. शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ग.दि.माडगूळकर यांच्या चौथ्या पिढीतील कुटुंब सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि गदिमा यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, पीएमआरडीए आयुक्त राजीव महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, सुमीत्र माडगूळकर आणि माडगूळकर कुटुंबिय आदी उपस्थित होते.

अकरा विविध विकासकामांचे उद्घाटन

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात निघोजे एमआडीसी तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाऊस व इतर प्रकल्प, बोऱ्हाडेवाडी व नेहरूनगर येथील शाळा इमारत, मोशी येथील उप अग्निशमन केंद्र (सब फायर स्टेशन), रावेत येथील सेक्टर ३२ए मधील उद्यान, मध्यवर्ती निर्जंतूकीकरण पुरवठा विभाग, चिंचवड येथील क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, चिखली येथील भाजी मंडई, निगडी येथील लाईट हाऊस प्रकल्प, स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल व वीर सावरकर उद्यानातील लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उपक्रमांचा शुभारंभ

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेलचे काम, डेअरी फार्म येथील पूलाचे काम, मोशी, डुडूळगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत, चोविसावाडी येथील नवीन अग्निशमन केंद्र उभारणे, गवळीमाथा व कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रीया केंद्र, पॅकेज ३ अंतर्गत भोसरी विभागातील धावडे वस्ती येथील पाण्याची टाकी बांधण्याच्या कामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. मनपा हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण, मालमत्तांची सुधारीत कर आकारणी, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरविणे आणि दिव्यांगांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते चिखली येथील १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि २०३१ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन चिखली येथे ३०० द.ल. लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे नियोजित असून त्यातील पहिल्या टप्प्यात १०० द.ल. लिटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

Views: 119
Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण

Next Post

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण: १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यतापाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठी च्या वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण: १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यतापाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठी च्या वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!