बीड जिल्हा, शिरुर (कासार ) तितरवणी गाव येथील श्रीमती द्वारकाबाई प्रल्हादराव कुडूक “constitution club of India” दिल्ली येथे ” सशक्त नारी गौरव पुरस्कार 2023″ ने नुकतेच गौरविण्यात आले. श्रीमती द्वारकाबाई प्रल्हादराव कुडूक यांना त्यांची सारनाथ संस्थेच्या, तसेच भीमाई, रामाई, विश्वाकर्मा महिला बचत गटांच्या माध्यमातुन पुणे अणि बीडमध्ये समाजात शिक्षण, महिला सबलीकरण, अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ठ समजाउपयुक्त काम केल्याने तसेच समाजामध्ये नैतिक नीतिमूल्ये जोपासून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, श्रीमती द्वारकाबाई प्रल्हादराव कुडूक यांना ” सशक्त नारी गौरव पुरस्कार 2023″ हा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे, देशात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन विश्व भ्रष्टाचार विरोध संगठन दिल्ली यांच्या द्वारे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते व देशातील विविध मान्यवरांच्या कामाचा आढावा घेऊन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी हा सोहळा 12 मार्च रोजी “constitution blub of India” दिल्ली या ऐतिहासिक स्थळी जेथे डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू अणि ईतर जण यांनी भारताची राज्यघटने संदर्भात कार्य पार पाडले येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भरतातील जवळपास 25 जणांचा सन्मान करण्यात आला. या वर्षी हा अवॉर्ड सोहळा पदश्री डॉ चंद्रकांत पाडव, रेल्वे बोर्डाचे चेअरमन रमेश चंद्ररत्ना, डायरेक्टर नौयडा फिल्म city संदीप मारवा, यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला तसेच महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर व ईतर मान्यवर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दिल्ली येथे हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती द्वारकाबाई प्रल्हाद कुडूक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे






