सुकळी . प्रतिनिधी (सुखदेव गायकवाड )आज रोजी दि .19/12/2022 रोजी डी.वाय एस .पी . संदीप मिटके यांना गुप्त खबरी मार्फत माहिती मिळाली असता चापडगाव येथील गदेवाडी कडे जाणाऱ्या रोडवरील शेतात शेडच्या आडोशाला काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत असी खात्रीशीर माहिती मिळाल्याने डी वाय एस पी मिटके सर यांनी तात्काळ पोलीस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता 4.66.280 रुपयाच्या मुद्देमालासह 9 आरोपी घेतले ताब्यात ‘ आरोपी क्र 1) कुंदन संभाजी मडके वय 30 वर्ष रा सोनई सांगवी ता शेवगाव 2) बाबासाहेब एकनाथ मस्के रा. आखातवाडा ता. पैठण जि.औरंगाबाद 3) भगवान अर्जुन झिरपे वय 47 वर्षे रा. कोळगाव ता. शेवगाव 4) रामकिसन नारायण कोलाळे वय 50 वर्ष रा. गदेवाडी ता. शेवगाव 5) भगवान बापूराव झिरपे वय 47 रा. कोळगाव ता. शेवगाव 6) भगवान विष्णू ढाकणे वय 43 वर्ष रा. हसनापूर तालुका शेवगाव 7) बाप्पासाहेब त्र्यंबक विघ्ने वय 40 वर्ष रा. कोर्टाच्या मागे तालुका शेवगाव 8) काकासाहेब भाऊसाहेब घोरतळे रा बोधेगाव ता शेवगाव 9) विनोद दत्तात्रेय नेमाने वय 30 वर्ष रा. चापडगाव ता शेवगाव. यांचे ताब्यातून 4,66,280/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सर्व आरोपी विरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे पो.कॉ.नितीन चव्हाण यांचे फिर्यादिवरून मुंबई जुगार कायदा कलम 12( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.*सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.स्वाती भोर,Dysp संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई दादाभाई मगरे,स.फौ.राजेंद्र आरोळे,पो.हे.कॉ सुरेश औटी,पो.कॉ नितीन चव्हाण,पो कॉ नितीन शिरसाठ आदींनी केली.






