परिवर्तन’ हेल्पलाईनचा धडाका : मोशीतील रस्त्याची दुरूस्ती २४ तासांत पूर्ण- बीआरटी रोडलगत खोदकाम बुजवून डांबरीकरण- स्थानिक नागरिकांकडून ‘परिवर्तन’च्या कार्याचे कौतुक
पिंपरी । प्रतिनिधी मोशी मधील बीआर टी रोड लगत गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी खोदून पाईपलाईन टाकल्यानंतर डांबरीकरण न केल्याने वाहनचालक व नागरिकांनी तक्रार केली होती. याची दखल घेत ‘परिवर्तन हेल्पलाईन’च्या माध्यमातून अवघ्या २४ तासांत रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली. याबाबत परिसरातील नागरिकांनी ‘परिवर्तन’च्या टीमचे कौतूक केले आहे.भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघासह परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय आणि सर्वजनिक समस्या सोडवण्यासाठी ‘परिवर्तन हेल्पलाईन’ सुविधा सुरू केली आहे. त्या माध्यमातून पायाभूत सोयी-सुविधांसाठी नागरिक आणि प्रशासनमधील ‘दुवा’ बनत प्रश्न मार्गी लावले जातात.पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने देहू- आळंदी बी आर टी रोड हा देहू व आळंदी या दोन तीर्थक्षेत्राना जोडण्यासाठी रस्ता विकसित केला आहे. याचा काही भाग मोशी गावाच्या हद्दीतून जातो. मोशीमधील बीआरटी रोडवरील भारत माता चौक ते आळंदीपर्यंत असलेल्या ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याकडेने गॅस लाईन टाकण्या साठी रस्ता खोदला होता. पाईपलाईन टाकण्याचे काम दोन महिन्यापूर्वी पूर्ण झाले असले, तरी त्यावर डांबरीकरण अद्याप पर्यंत करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होत असून अपघात पण होत आहेत, अशी तक्रार नागरिकांनी केली होती, अशी माहिती ‘परिवर्तन हेल्पलाईन’चे मुख्य समन्वयक ऋषभ खरात यांनी दिली.**परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले समाधान…अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. भोसरी चेअरमन व वेदिक विजडंम् एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते म्हणाले की, संपूर्ण दगड-खडी वर आली आहे. खड्डे पडले होते. दुचाकी या खडी वरून घसरत असून अपघाताचा धोका होता. ‘मॉर्निंग वॉल्क’ ला येणाऱ्या महिला, पुरुष व लहान मुले यांच्या अनेकदा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे खोदलेल्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. यावर ‘परिवर्तन हेल्पलाई’च्या माध्यमातून रस्त्याच्या दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. याबाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.