• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

मातंग समाजाने शिक्षणाची कास धरल्यास उन्नती होईल : अमित गोरखे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 4, 2022
in Uncategorized
0
0
SHARES
4
VIEWS
भोसरी येथे मातंग समाज दसरा महामेळावा उत्साहातपिंपरी : स्त्रीशक्तीने एकत्र येऊन आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत-जास्त शिक्षित समाज करून समाजात आपले योग्य ते स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केले.मातंग समाज दसरा महामेळावा बालाजी नगर, भोसरी येथे पार पडला. मेळाव्याचे हे पहिलेच वर्ष होते. हा मेळावा मातंग चेतना परिषद, पिंपरी-चिंचवड आणि लहुजी टायगर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सद्गुरुसंत परमपूज्य दादा महाराज रामदासी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा प्रदेश सचिव आणि अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे होते. कार्यक्रमाला वक्ते म्हणून अंबादास सकट, धनंजय भिसे, प्रा. सुभाष खिलारे आदी उपस्थित होते.अंबादास सगट यांनी मातंग समाजाच्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक विषयांवर भाष्य केले. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीची सुरुवात ही मातंग समाजापासून कशी झाली तसेच बळीराजा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी व त्याचा पहिला बळी हा मातंग समाजाने दिला हे सांगितले.कार्यक्रमाची सुरुवात हलगीच्या तालावर शस्त्रपूजन मिरवणूकीने झाली. कु. मोनिका गोळे हिने दांडपट्ट्याचे व दंडाच्या साहसी मर्दानी खेळाचे प्रदर्शन केले. दीप प्रज्वलन तसेच साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिगुरू श्री लहुजी साळवे यांच्या अर्ध पुतळ्यांना पुष्प माला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रसिद्ध लोक कलावंत आसाराम कसबे यांनी लहू वंदना सादर केल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरू झाली.धनंजय भिसे यांनी सद्यस्थितीतील मातंग समाजाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.खिलारे यांनी मातंग समाजाची पूर्वपरंपरा काय आहे, १८ पुराणातील बसवे पुराण हे मातंग समाजाचे इतिहास सांगणारे पुराण आहे अशी माहिती दिली तसेच ‘गाव गाडा’ आणि ‘गाव गाड्यांच्या बाहेर’ या दोन पुस्तकांचा संदर्भ देऊन मातंग समाजाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमाला आमदार महेश दादा लांडगे यांचे प्रमुख सहाय्य लाभले. तसेच स्थानिक माजी नगरसेवक विलास मडेगिरी, उद्योजक अनिल सौंदाडे आणि आयोजकांमधील कार्यकर्त्यांच्या आर्थिक पाठबळावर कार्यक्रम किमान ४०० जणांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. कार्यक्रमांच्या दरम्यान उपस्थित पत्रकार, विशेष गुणगौरव दाखविलेल्या मुला-मुलींचा आणि समाजातील निमंत्रितांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब वाघमारे, अध्यक्ष लहुजी टायगर युवा मंच यांनी केले. नाना कांबळे, मातंग चेतना परिषद यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुकन्या साक्षी कांबळे तसेच सचिन वाघमारे यांनी केले.

धर्मांतर रोखले पाहिजे…अध्यक्षीय भाषणामध्ये दादा महाराजांनी पुराण काळापासून शिवपार्वतीला हळद लावणारे, पहिला धागा तयार करणारे मातंग आहेत तिथपासून शिवाजी महाराजांना पावनखिंडीच्या लढाईतून विशाळगडावरती घेऊन जाणारे चार प्रमुख अंगरक्षक हे मातंग होते याचे दाखले दिले. मातंगी देवी, मातंग ऋषी, श्रीकृष्णाचे गुरु सांदीपानी ऋषींपासून उज्वल परंपरा असणाऱ्या समाजाचे गेल्या हजार वर्षांमध्ये कसं सामाजिक अध:पतन झालं याच्यावर भाष्य केलं. या दुर्बलतेमुळे आपल्या समाज बांधवांचे कसे ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण चालू आहे आणि आपण सर्व समाज म्हणून एकत्र येऊन हे रोखण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, अशी भूमिका मांडून समाज चेतना जागृतीचे भाष्य केले.
Views: 132
Previous Post

Chandni Chowk Bridge: पुण्याची सत्ता हाती आली तर…; ‘त्या’ ठेकेदारासाठीचं वसंत मोरेंचं ट्विट चर्चेत

Next Post

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ५ कोटी ७८ लाख रुपयांच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

Related Posts

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
Uncategorized

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली

May 6, 2026
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
Next Post
सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ५ कोटी ७८ लाख रुपयांच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!