• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
May 5, 2026
in आपले शहर
0
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
0
SHARES
24
VIEWS

पिंपरी, दि. ५ मे २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील विविध प्रभागांमध्ये फूटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे ते १५ मे दरम्यान शहरात पदपथ मुक्त पंधरवडा मोहीम आखान्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील विविध भागात मुख्यालय अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात येत आहे.फ प्रभागात २ व ३ मे रोजी RTO रोड, त्रिवेणी नगर चौक ते तळवडे चौक, तसेच देहू-आळंदी रोड परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईत टपऱ्या, हातगाड्या, प्लास्टिक कॅरेट, लोखंडी रॅक, स्टँड बोर्ड, खुर्च्या, टेबल यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. तसेच भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडील टमाटर, भेंडी, बटाटा, काकडी, मिरची यांसारखा शेकडो किलो भाजीपाला जप्त करून इस्कॉन अन्नामृत अन्नछत्र येथे जमा करण्यात आला.याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १, चिखली येथे सत्संग रोड ते पिंगळे चौकपर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला असून सर्व हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.इ क्षेत्रीय कार्यालय भोसरी अंतर्गत ३ व ४ मे रोजी आळंदी रोड व भोसरी नाट्यगृह परिसरात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत हातगाड्या, इलेक्ट्रिक काटे, स्टँडी बोर्ड, टेबल, छत्र्या तसेच कपडे व चप्पलांचे गाठोडे जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी MSF जवान, पोलीस कर्मचारी व महापालिका कर्मचारी यांचा समन्वय ठेवण्यात आला.ड प्रभाग, रहाटणी परिसरात ४ मे रोजी जगताप डेअरी ते पिके चौक, कुणाल आयकॉन रोड व गोविंद गार्डन परिसरात मोहीम राबविण्यात आली. येथे कूलर, हातगाड्या, पाणीपुरी ठेले, प्लास्टिक कॅरेट यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. तसेच फळ विक्रेत्यांकडील आंबे, केळी व नारळ मोठ्या प्रमाणात जप्त करून अन्नछत्रात जमा करण्यात आले.याशिवाय पिंपळे सौदागर परिसरातही फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असून H झोनमध्येही पदपथ अतिक्रमणमुक्त मोहिमेला गती देण्यात आली आहे.महापालिकेने जप्त केलेले सर्व साहित्य संबंधित गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले असून, नागरिकांनी सार्वजनिक रस्ते व फूटपाथ मोकळे ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास आणि पादचाऱ्यांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध होण्यास मोठी मदत होत आहे……कारवाईवेळी सहभागी कर्मचारीसदर अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान महापालिकेचे अतिक्रमण निरीक्षक, बीट निरीक्षक, प्रशासन अधिकारी तसेच विविध प्रभागांतील अधिकारी व कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले होते. या मोहिमेत एम जवानांची मोठ्या प्रमाणावर मदत घेण्यात आली असून, महापालिकेचे कर्मचारी, कंत्राटी मजूर, ड्रायव्हर, कॅमेरामन तसेच पोलीस कर्मचारी यांनी समन्वय साधून कारवाई यशस्वी केली. विविध प्रभागांमध्ये संबंधित बीट निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून, सर्व घटकांनी संयुक्तपणे काम करत शहरातील फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली……कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य (एकत्रित तपशील)साहित्य प्रकार :टपऱ्या – ०४हातगाड्या – १५सोडागाडी – ०१कूलर – २५इलेक्ट्रिक काटे – ०३लोखंडी काटे – ०१प्लास्टिक टेबल / लोखंडी टेबल – ०५प्लास्टिक / लोखंडी खुर्च्या – ०७स्टँडी बोर्ड – १३लोखंडी रॅक / फ्रेम – ०४छत्र्या / छत्री स्टँड – ११पंखे (स्टँडसह) – ०४प्लास्टिक कॅरेट – १०२लाकडी कॅरेट – ०८दुधाचे कॅरेट – २४टायर (मोठे/छोटे) – १४टायर ट्यूब – १०लाकडी प्लायवूड – १४ताडपत्री – ०२नेट जाळी – ०१कागदी बॉक्स – २५पाणी जार – ०३प्लास्टिक बकेट / डस्टबिन – ०३लोखंडी भट्टी बॅरल – ०१कपडे गाठोडे – ०७चप्पल गाठोडे – ०२….भाजी पाला व फळे (अन्नछत्रात जमा) :टमाटर – ८० किलोमिरची – ४० किलोभेंडी – ७० किलो गवारी – ६० किलो दोडका – ३० किलो वांगी – ३५ किलो शेवगा – १५ किलो तोंडली – १० किलो काकडी – ५० किलोअद्रक – ०८ किलोगोसावळे – २० किलो कोबी – १५ किलो दुधी भोपळा – २५ किलो बटाटा – १०० किलो काशिफळ भोपळा – ०७ नग कारले – ०५ किलो कलिंगड / पपई – प्रत्येकी ०१ कॅरेटआंबे – १३ कॅरेट केळी – ०५ कॅरेट + ०२ डझन नारळ – १२ कॅरेटखरबूज – ०१ कॅरेट…..

Views: 38
Previous Post

hfbg

Next Post

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
Next Post
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!