प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १ ऑगस्ट२०२४ महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात शेती व नविन औद्योगिक वसाहतकरीता महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग मार्फत उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी व औद्योगिक वसाहतींचे मोठया प्रमाणात नुकसान होत होते. सदरचे घटना रोखणे व गुन्हेउघडकीस आणणे हे पोलीसांसाठी आव्हानात्मक ठरले होते.सदर विद्युत रोहित्र चोरीचे गुन्हयांना पायबंध घालण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, श्री विनय कुमार चोबे सो, यांनी तात्काळ गुन्हे दाखल करुन जलदगतीने तपास करण्याबाबत वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार परिमंडळ – ३ चे पोलीस उप आयुक्त श्री. शिवाजी पवार, चाकण विभागचे सहा. पोलीस आयुक्त श्री. राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शना नुसार महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन गिते यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली.सदर विद्युत रोहित्र चोरीचे ठिकाणे ही ग्रामीण व दुर्गम भागातील निर्जन जागेत, नविन औद्योगिक वसाहत सुरु होत असल्याचे निर्जन ठिकाणी असत. सदर चोरीच्या घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळुन येत नव्हते, त्यामुळे चोरटयांचा शोध घेण्यामध्ये तपास पथकांना अडचणी येत होत्या. अशा बिकट स्थितीत तपास पथकाचेसहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार यांनी रोहित्र चोरीचे कालावधीं, वार, वेळ यांचा बारकाईने अभ्यास करुन परिसरात संशयीतरित्या वावरणारे लोकांची माहिती प्राप्त केली. सदर चोरी बाबत घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करुन काही संशयीत व्यक्तींना ताब्यात घेवुन कसून तपास करता त्यांनी विद्युत रोहित्र मधील तांब्यांचे तारा चोरल्याची कबुली दिली. सदर आरोपी यांचेकडुन विद्युत रोहित्रामधील तांब्याचे तारा व पट्ट्या, रोहित्र खोलण्यासाठी वापरलेले साहित्य- लहान मोठ्या आकाराचे पान्हे, पक्कड, हातोडी इ. तसेच गुन्हयासाठी वापरेली वाहने इंडीका कार व इतर चोरलेल्या दुचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांची माहिती पुढील प्रमाणेअटक आरोपींची नावे १) रमेश उर्फ राहुल बाळु पडवळ, वय २७ वर्ष, राहणार निमगाव दावडी, ता-खेड जि पुणे२) सुनिल उर्फ सैराट शिवाजी गावडे, वय २१ वर्ष राहणार निमगाव दावडी, ता खेड जि पुणे३) सुनिल सुरेश गावडे, वय २३ वर्ष, राहणार खडकी पिंपळगाव, ता आंबेगाव, जि पुणे४) रविद्र सुरेश गावडे, वय २३ वर्ष राहणार खडकी पिंपळगाव, ता आंबेगाव, जि पुणे५) उस्मान बिलाल अब्दुल अब्बुहरेरा, वय २० वर्ष, राहणार हन्टसमन चौक, भांबोली ता खेड जि पुणे,६) कार्तिक नामदेव पवार, वय २५ वर्ष, राहणार राक्षेवाडी, ता-खेड जि पुणे.अटक आरोपी यांचे गुन्हे अभिलेख तपासले असता आरोपी क्र १ ते ३ हे सराईत गुन्हेगार असुन त्यापैकी आरोपी क्र १) रमेश उर्फ राहुल बाळु पडवळ याचेवर अहमदनगर व पुणे जिल्हातील वेगवेगळया पोलीस ठाण्यामध्येचोरीचे एकुण १६ गुन्हे दाखल आहेत, आरोपी क्र २ सुनिल उर्फ सैराट शिवाजी गावडे यांचेवर चोरीचे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी क्र ३ सुनिल सुरेश गावडे याचेवर चोरीचा ०१ गुन्हा दाखल असल्याचे आढळुन आले आहे.आरोपी यांचेकडुन जप्त मुद्देमाल :-१) २,७५,०००/ रु किंमतीचे ३४० किलो वजनाचे तांब्याचे तारा व पट्टया ( वेगवेगळया विद्युत रोहित्रांमधील)२) ५,२५,००० /- रु किंमतीची गुन्हयात वापरलेली व चोरलेली वाहने ( एक इंडीका चारचाकी व पाच दुचाकी वाहने ) असा एकूण ८,००,०००/रु आरोपी यांचेकडुन उघडकीस आलेले विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) गुन्हे -१) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८९ / २०२४ भा. वि. का. २००३ क. १३६२) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १४३ / २०२४ भा.वि. का. २००३ क. १३६३) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १६६ / २०२४ भा. वि. का. २००३ क. १३६४) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०९/२०२४ भा. वि.का. २००३ क. १३६५) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२६ / २०२४ भा. वि. का. २००३ क. १३६६) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४७ / २०२४ भा. वि. का. २००३ क. १३६(७) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५३ / २०२४ भा.वि.का. २००३ क. १३६८) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८० / २०२४ भा.वि.का. २००३ क. १३६९) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६१ / २०२४ भा. वि. का. २००३ क. १३६,१३८*आरोपी यांचेकडुन उघडकीस आलेले वाहन चोरीचे गुन्हे -*१) महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७० / २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)२) चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. १०४९/२०२३ भा.द.वि.क. ३७९३) हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८७५ / २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ क. ३०३ (२) *आरोपींची गुन्हे करण्याची पध्दत* निर्जन व दुर्गम भागात असलेल्या शेती तसेच नविन तयार होत असलेल्या औद्योगिक वसाहतीचे ठिकाणी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर हेरुन रात्रीच्या वेळी त्यास असलेले डि.ओ.चा खटका बंद करुन त्यातील विद्युत कनेक्शन डिस्कनेक्ट करणे व ट्रान्सफॉर्मर बॉक्स खाली पाडुन त्यातील तांब्याचे तारा चोरुने नेणे.*पोलिसांचे आवाहन*नागरिकांनी शेती व निर्जन ठिकाणांचे जवळील विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) यांचे ठिकाणी कोणी अनोळखी इसम वावरत असल्याचे आढळुन आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा श्री. संदिप डोईफोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ३ डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्री. राजेंद्रसिंह गौर, यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन गिते, सहायक पोलीस निरीक्षक श्री कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजु कोणकेरी, युवराज बिराजदार, तानाजी गाडे,विठ्ठल वडेकर, अमोल बोराटे, प्रकाश चाफळे, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, अमोल माटे, मंगेश कदम, शरद खैरे, तसेच पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ यांचे कार्यालयकडील पोलीस हवालदार राजु जाधव यांनी केली आहे.