गेवराई प्रतिनिधी: नुसताच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखडा ( SCERT ) नेजाहीर केला आहे त्यामध्ये राज्य मंडळाच्या शाळां मधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक तसेच आराखड्या मध्ये मनुस्मृति मधील श्लोकचासमावेश करण्याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचे समजत आहे प्रथम आम्ही या गोष्टीचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कडाडून विरोध करत आहोत शालेय विद्यार्थ्यांना मनुस्मृतीची गरज नसून त्यांना भारतीय संविधान शिकवण्याची अत्यंत गरज आहे महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवराय संभाजी राजे या महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे पुरोगामी राज्य आहे 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती स्वतः जाळली होती त्याच मनस्मृतीचे बीजेपी सरकार पुन्हा एकदा पुनर्वसन करण्यास प्रयत्न करत आहे हा खोडसाळपणा शिक्षण मंत्री यांनी थांबावा अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख संजय भैया सोनवणे यांच्या आदेशा नुसार तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे