आनंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास हरकत असून ही सर्वेक्षणाचा घातला जातोय घाट
पिंपरी चिंचवड दि. ०८ फेब्रूवारी २०२४ पिंपरी चिंचवड पालिका कार्यक्षेत्रामधील प्रभाग क्रमांक 19 मधील आनंद नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास हरकत असण्या बाबत श्री. निलेश गटने, साहेब आयुक्त, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विभाग पुणे व पिंपरी चिंचवड यांना RTI HUMAN RIGHTS ACTIVIST FEDERATION OF MAHARASHTRA चे संस्थापक अध्यक्ष विनोद क्षिरसागर यांनी निवेदनाद्वारे वरिल विषयास विरोध करण्यात आला आहे.पूढे विनोद क्षिरसागर बोलले की झोपडपट्टीतील नागरिकांची संमती नसताना बेकायदेशीरपणे शासनाकडून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला आमचा विरोध असणार आहे. यावर त्यांनी काही प्रश्न ही उपस्थित केले.पिंपरी चिंचवड पालिका कार्यक्षेत्रामधील प्रभाग क्रमांक 19 मधील आनंद नगर झोपडपट्टी मध्ये 2002 पासुन म्हणजे गेली वीस वर्षे ते आज पर्यंत झोपडी सर्वेक्षण झालेले नाही याचे कारण काय? मग एवढ्या वर्षानंतर अचानक आज रोजी प्राथमिक झोपडी सर्वेक्षणाचे कोणतेही फलक/होर्डिंग न लावता प्राथमिक झोपडी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.इतक्या अति तातडीने प्राथमिक झोपडी सर्वेक्षण कशाला? सर्वेक्षणाची इतकी घाई कोणाच्या फायद्यासाठी ? मुंबई व पुण्यासारख्या अनेक ठिकाणी एस. आर. ए. अंतर्गत पुनर्वसनाचे अनेक प्रकल्पात नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. SRA चे अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष फसले व रखडलेले आहेत. त्याची वाईट व गंभीर परिणाम संबंधित नागरिक भोगत आहेत. अशी परिस्थिती आमच्या आनंद नगर मधील कुठल्याही नागरिकांवर अशी वेळ येवू नये यासाठी आनंदनगर झोपडपट्टीतील पुनर्वसना बाबत पुढील मुद्दे व प्रश्न महत्त्वाचे आहेत त्याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे त्यानंतरच प्राथमिक झोपडी सर्वेक्षण व पुनर्वसन करावे.१) आनंद नगर मध्ये २३६७ फोटो पास धारक झोपडपट्टी वासी आहेत. त्याचबरोबर 30 वर्षांपूर्वी त्यावेळचे जागा मालक महेश पाटील व सुदेव वेंचर या कंट्रक्शन कंपनीचे मालक देवानंद शेट्टी या दोघांमधील मालकी हक्का बद्दलचे वाद मिटले का? या बाबत एस.आर. ए. प्रशासन व बिल्डरची नेमकी भूमिका काय आहे?२) आनंद नगर येथे रहात असलेल्या सर्वांचे (रेल्वे बाधित आणि खाजगी जागेवरील ) लाभार्थींचे पुनर्वसन आहे त्याच जागेवरती होणार आहे का? एकही झोपडी धारक स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची कायदेशीर हमी कोण देणार प्रशासन की बिल्डर ?.३) ज्या कुटुंबात फोटो पास एक आहे. मात्र घरे तीन आहे. त्या कुटुंबांना तीन घरे मिळतील याची विश्वासहार्य कायदेशीर हमी मिळाली पाहिजे. ती जवाबदारी कोण स्विकारणार ते लेखी प्रमाणीत करावे.४) सदर एकूण जागेचे क्षेत्रफळ किती आहे? या एकूण जागेत बिल्डर किती बांधकाम करणार आहे? आनंद नगर मधील नागरिकांना किती जागेत बसवणार आहे? बिल्डरला एकूण किती जागा विकण्यासाठी उपलब्ध राहणार आहे? या जागेत एफएसआय किती आहे? या जागेचा बिल्डरला किती टीडीआर मिळणार आहे? तो बिल्डर मिळणारा टीडीआर पैकी या ठिकाणी किती टीडीआर वापरणार आहे?किती टीडीआर विकणार आहे? यामध्ये स्पष्टता यायला हवी. ५) 2005 साली आनंद नगर झोपडपट्टीतील अनेक रेल्वे बाधित नागरिकांची मूळ फोटो पास महानगरपालिकेने जप्त केले आहेत त्यांचे काय?६) मूळ फोटो पास झोपडीधारकाकडून विकत घर घेतले आहे. त्याबाबत त्याला घर मिळण्याबाबत बिल्डरची नेमकी भूमिका काय आहे? ७) एस. आर. ए. अंतर्गत पुनर्वसित होणाऱ्या बिल्डिंगचे पूर्ण काम होण्यासाठी नेमका किती कालावधी लागणार आहे? . ८) या इमारती नेमक्या किती मजली असणार आहेत?९) पुनर्वसन प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित लाभार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नेमकी कुठे व कशी करण्यात येणार आहे? त्याचे शासनाच्या आदेशानुसार किमान भाडे किती? व कोण देणार करणार? किती वर्षासाठी देणार? १०) या इमारती होत असताना येथील रहिवाशांना ओपन स्पेस किती ठेवणार त्यामध्ये मुलांना खेळाचे मैदान, बाग, समाज मंदिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र आदि नेमक्या काय काय सुविधा देणार?विकासाचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे का? याचे स्पष्टीकरण जाहिर करण्यात यावे.११) सदर प्रकल्पातील तयार झालेल्या इमारतींची वर्षानुवर्षे पाण्याची पाईपलाईन, लाईट, लिफ्ट व पेंटिंगची मेन्टेनन्स वर्षानुवर्षेची जबाबदारी कोण घेणार? किती वर्ष घेणार ?९) या इमारतीला लिफ्ट असणार आहे किंवा कसे? या लिफ्टचे मेंटेनेस कोण करणार? बिल्डर या लिफ्टच्या मेंटेनेसची जबाबदारी किती वर्ष घेणार? १०) पुनर्वसन प्रकल्प बांधत असताना वापरण्यात येणाऱ्या पेंट(रंग), सिमेंट, लोखंड, टाइल्स, ग्रॅनाईट, नळे, इलेक्ट्रिकल वायर व इलेक्ट्रिक वस्तू कोणत्या कंपनीचे वापरणार आहात? १२) आनंद नगर मधील छोटे-मोठे व्यवसाय करणारे नागरिक आहेत त्यांना नेमकी किती स्क्वेअर फुटाचे गाळे मिळणार आहेत? त्यासाठी वेगळी रक्कम भरावी लागणार आहे का? याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे. १३) आनंद नगर मधील काही जागा रेल्वे बाधित व काही खाजगी मालकी ची आहे रेल्वे बाधित जागा सोडून उर्वरित खासगी जागेवर हा प्रकल्प होणार आहे का? तर रेल्वे बाधित झोपडी धारकांचे पुनर्वसनाचे काय धोरण ? याबाबत विश्वासहार्य कायदेशीर हमी अशा प्रत्येक रहिवाशांना मिळाली पाहिजे? ती हमी एस. आर. ए. चे प्रशासन देणार की बिल्डर देणार आहे किंवा कसे? १४) मुंबई व पुण्यासारख्या ठिकाणी एस. आर. ए. अंतर्गत पुनर्वसनाचे अनेक प्रकल्पात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. SRA चे अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष फसले व रखडलेले आहेत. आनंद नगर पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याकारणाने नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी पुनर्वसन प्रकल्प बंद होऊ नये यासाठी विकसकाकडून पुनर्वसन प्रकल्पासाठी बँक गॅरंटी घेतली जाणार आहे की नाही? किती?१५) आनंद नगर पुनर्वसन प्रकल्पासाठी शासनाने नियोजित केलेल्या विकसकावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे व न्यायालयीन दिवाणी व फौजदारी खटले प्रलंबित व दाखल आहेत. याची सविस्तर माहिती नागरिकांसाठी जाहीर प्रकटन करणे गरजेचे आहे. या सर्व महत्त्वांच्या प्रश्नाबाबत बाबत पूर्ण लेखी स्पष्टीकरण झाल्यानंतर व आनंद नगर मधील सर्व रहिवाशांचे समाधान झाल्यानंतर या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व नागरिक सर्वानुमते या कामाला मान्यता देतील आणि ही प्रक्रिया पुढे जाईल अशाच प्रकारचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबत एकत्रित येऊन चर्चा व्हायला हवी. आनंद नगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना चांगल्यात चांगले पुनर्वसन व घरे मिळणार असतील तर त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद आहे. मात्र मुंबई व पुण्यासारख्या ठिकाणी एस. आर. ए. अंतर्गत पुनर्वसनाचे अनेक प्रकल्पात नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. SRA चे अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष फसले व रखडलेले आहेत. त्याची वाईट व गंभीर परिणाम संबंधित नागरिक भोगत आहेत. अशी परिस्थिती आमच्या आनंद नगर मधील कुठल्याही नागरिकांवर आली नाही पाहिजे त्यामुळे आनंद नगरमधील झोपडी धारकांच्या वतीने मी नम्रतेची विनंती करतो की तात्पुरत्या स्वरूपात सदरचे सर्वेक्षण थांबण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक काळूराम पवार तसेच भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष नेताजी शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सागर शिंदे, मारुती कानडी व इतरही सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.