आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी आपणास अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. त्याबद्दल सर्व प्रथम महाविकास आघाडीमधील सर्वच नेत्यांचे मन:पूर्वक आभार. आपल्या सहकार्याने आणि आशीर्वादानेच फक्त हि किमया साधता आली. त्यामुळे आपले मनस्वी अभिनंदन. या महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी आपण माझ्या सोबत यावे, ही मनापासून विनंती.दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता खंडोबा मंदिर, आकुर्डी येथून आपल्या उमेदवारी अर्जाच्या पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेची सांगता माळसाकांत विद्यालय चौक येथे होईल आणि त्यानंतर हेडगेवार भवन येथे अर्ज दाखल केला जाईल.आपली उपस्थिती मला मोठा आत्मविश्वास देईल. आपण सर्वांनी या पदयात्रेत सहभागी होऊन माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रवासात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.आपलीच,सुलक्षणा शिलवंत धरhttps://www.sulakshanashilwant.com/about-me/mh