बीड प्रतिनिधी – गेवराई पंचायत समिती येथिल कृषि अधिकारी नागरगोजे यांनी गेवराई तालुका बीड तालुक्यामधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजने अंतर्गत विहीरीच्या मोबदल्यामध्ये अमाप पैशाची लुट लाभार्थी यांच्याकडून केलेली आहे.हे की,ज्या लाभार्थ्यांना पैसे देण्यास नकार दिला त्या लाभार्थीचा विहीरीचा लाभ नाकारला आहे. याची मनमानी कृषि अधिकारी यांनी केली आहे. याच पध्दतीने गेवराई तालुक्यातील मौजे रामपुरी येथील लाभार्थी तेजस विश्वनाथ शरणांगत यांनी पैसे देण्याचे नकार दिल्याने त्या लाभाथ्र्यांचा विहिरीचा लाभ संबंधित अधिकारी यांनी रद्द केला.हे की संबंधीत कृषि अधिकारी नागरगोजे यांनी बीड गेवराई या तालुक्यात अमाप पैसे गरीब लाभार्थीकडून घेतलेले आहेत. जर नागरगोजे हे पंचायत समिती, गेवराई ऑफीसला येतात ते 60 लाख रु. किंमतीच्या गाडीत येतात. ऐवढे पैसे कोठुन आले व त्यांची वेतन श्रेणी काय आहे ? लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी साहेब यांनी पुर्ण कुटुंबासहित मालमत्तेची चौकशी करुन भ्रष्टाचाराने कमवलेली मालमत्ता जप्त करावी व योग्य कार्यवाही करावी.आसे निवेदन महाराष्ट्र आसोशियन पत्रकार संघाचे महा . संपर्क प्रमुख विश्वनाथ शरणांगत पत्रकार यांनी निवेदनातून मागणी केली केली आसुन त्याच बाबत आतिरिक्त मुख्य आधिकारी साहेब जि.प. बीड यांना पण माहिती व कार्यरत व निवेदन दिले आहे .