पिंपरी : राष्ट्रीय भ्रष्टाचार अत्याचार निवारण संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दिनांक १६. ०४. २०२३ रोजी सकाळी १०:०० ते ५:०० या वेळे मध्ये कार्यकर्ता सन्मान समारंभ सोहळा अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे संपन्न होणार आहे. सदर उपक्रम समाजातील थोर समाज सेवक व ज्या सदस्यांनी मनोभावे आणि तन मन – धनाने उत्तम कार्य केले आहे अशा १२५ सन्मान पुरस्कार ते यांचा सन्मान होणार आहे. भ्रष्टाचार अत्याचार पीडित सर्व घटकावर परिश्रम घेऊन जनमानवाला निस्वार्थपणे मदत केली आहे. अशा सेवकांना आणि कार्यकर्त्याना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन, सन्मानित करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार सन्माननीय श्री. महेश दादा लांडगे आणि संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश शुक्लाजी उपस्थित राहणार आहेत, या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज कुमार इंडोलिया ( चौधरी ) व श्री डॉ.बडे ए.व्ही. श्री.अशोक ढोकळे, डी. एस. गरुड, किशोर देवकर, सौ कल्याणी मेमाणे,प्रतीक ठाकूर, दामोदर गायकवाड, संभाजी राठोड, मेहबूब शहा, आकाश कुमार पांडे, श्री.संतोष बागडे, अमित शुक्ला, मुस्कान गुलवाणी हे सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत..