सुकळी ‘ प्रतिनिधी — ( सुखदेव गायकवाड ) -अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा शनिवारी पार पडले असून स्पर्धेत अंजली सुखदेव गायकवाड 1500 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम तर भक्ती पंडित भवर हिने द्वितीय क्रमांक मिळवून या दोघींची ही जिल्हास्तरावर निवड झाल्याने सर्व स्तरातून दोन्हीही खेळाडूंचे अभिनंदन केल्या जात आहे ,शेवगाव येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटात बालमटाकळी येथील श्री भगवान विद्यालयतील खेळाडू अंजली सुखदेव गायकवाड हिने 1500 मीटर.धावणे मध्ये प्रथम व लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक तर भक्ती पंडित भवर हिने लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक व 1500 मी.धावणे मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून दोन्हीही खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. त्यांना क्रीडा शिक्षक कल्याण मापारे सर यांनी मार्गदर्शन केले तसेच.संस्था अध्यक्ष श्री प्रकाश बोरा, मुख्याध्यापक गुंड सर, .पर्यवेक्षक खेडकर सर ,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पत्रकार सुखदेव गायकवाड ,पत्रकार . जयप्रकाश बागडे ,पत्रकार पांडुरंग निंबाळकर, पत्रकार ईसाक शेख ‘ पत्रकार अनिल कांबळे ‘ पत्रकार रावसाहेब निकाळजे . पत्रकार . उद्धव देशमुख ‘ पत्रकार सुनील पहिलवान . पत्रकार दिलीप महानोर ‘ पत्रकार संतोष घरगणे ‘ पत्रकार प्रकाश गायकवाड . पत्रकार कैलास पौळ ‘ पत्रकार विठ्ठल मोहिते ‘ पत्रकार बाळासाहेब धस ‘ सुकळी सरपंच लहुराव भवर . पंडीत भवर .कांता भवर .व ग्रामस्थ यांनी खेळाडूंची अभिनंदन केले.