पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका आणि अन्य निवडणुकांमध्ये भाजपावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केले.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक आमदार विकासनिधीतून वाकड येथील प्रिस्टाइन प्रोलाइफ फेज-१ आणि आर के लाइफस्पेस सोसायटी या दोन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ओपन जिमचे साहित्य बसवण्यात आले आहे. या ओपन जिमचे भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भारती विनोदे, राम वाकडकर, गणेश कस्पटे, रामदास कस्पटे, रणजीत कलाटे तसेच दोन्ही गृहनिर्माण सोसायट्यांचे सभासद व नागरिक उपस्थित होते.भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका आणि अन्य निवडणुकांमध्ये भाजपावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा देणे हे भाजपाचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतूनच लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्थानिक विकासनिधीतून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील गृहनिर्माण सोसायट्यांना जागा उपलब्ध असेल त्याठिकाणी ओपन जिमचे साहित्य दिले गेले आहे. या ओपन जिमचा वापर करून नागरिकांनी आपले आरोग्य उत्तम राखावे. नागरिकांनी मतदानरूपी दिलेल्या आशिर्वादाची परतफेड विकासाच्या माध्यमातून यापुढेही करत राहू, अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली.”