*_हिंदूवीर चव्हाण के यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन व कॉरिडॉरसाठी सोडला संकल्प_*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.27- प्रखर हिंदूवादी व्यक्तिमत्व तथा पत्रकार हिंदू वीर चव्हाण के यांनी आज देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले व कॉरिडॉरसाठी संकल्प सोडला. परळी येथील प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे यासाठी दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. काशी विश्वनाथ, उज्जैनच्या धर्तीवर पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे यासाठी आता थेट दिल्ली दरबारी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य हिंदू वीर सुरेश चव्हाणके यांनी परळीत केले.त्यांच्यासोबत श्यामजी महाराज होते.यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रधानमंत्री कार्यालय, सांस्कृतिक खाते, पर्यटन खाते आदी विभागात परळी वैजनाथ कॉरिडोरसाठी मदत करू. पण, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा मुद्देसूद मसुदा स्थानिक व जिल्हा प्रशासनाने त्वरित करावा असे प्रतिपादन त्यांनी केले. धार्मिक कॉरिडॉरसाठी प्रधानमंत्री हे नेहमीच आग्रही आहेत. महाराष्ट्रीयन असल्याच्या नात्याने प्रभू वैद्यनाथाचा भक्त म्हणून मी स्वतः दिल्लीत यासाठी पाठपुरावा सुरेश चव्हाणके म्हणाले.