सुकळी (प्रतिनिधी) सुखदेव गायकवाडशेवगाव तालुक्यातील हातगाव येथील सर्व अंगणवाडी सेविकांच्या वतीने अंगणवाडी क्र.१५९ येथे पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती व बालदिन साजरा करण्यात आला आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके, महिला व बाल कल्याण विभाग एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेचे प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडधे व पर्यवेक्षिका मंदा बडे यांचे आदेशान्वये हातगाव येथील एकूण ६ अंगणवाडी केंद्रातील सेविका व मदतनीस यांनी एकत्र येत सामूहिकपणे येथील अंगणवाडी क्र.१५९ येथे बालदिन साजरा केला.तसेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.यावेळी उपस्थित बालकांना अंगणवाडी सेविकांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रमास अंगणवाडी सेविका उषा भराट, आशा पठाण, राधा भालेराव, बेबीताई निकाळजे, सुरेखा गाढे, मदतनीस कुसुमबाई मातंग, उज्वलाबाई परदेशी, लताबाई अभंग यांचेसह इतरही महिला उपस्थित होत्या.