डुकरांच्या उपद्रवामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेती धोक्यात
सुकळी (प्रतिनिधी) सुखदेव गायकवाडं )शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात मुंगी, हातगाव, कांबी, बोधेगाव, बालमटाकळी सुकळी व लाडजळगाव गायकवाड जळगाव शिवारातील शेतीडुकरांच्या उपद्रवामुळे शेती धोक्यात आली असुन शेतात पेरलेल्या व लागवड केलेल्या सर्व शेत पिकांची मोठ्या प्रमाणात डुक्कर नासाडी करत असुन त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तरी या डुकरांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा.अन्यथा कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक कमुभाई शेख यांनी दिली आहे.ते म्हणाले की, पैठण उजव्या कालव्यामुळे शेवगावच्या पूर्व भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली घेण्यात आले असुन त्यामध्ये शेतकरी बांधव नगदी पीक समजल्या जाणाऱ्या ऊस, कपाशीसह इतरही बागायती पिकांची लागवड केली असुन डुक्कर या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहे.हा प्रकार गेली अनेक महिन्यांपासून सुरु असल्याने याबाबत काहीच ठोस निर्णय होत नसुन अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याने मोला महागाईची बी-बियाणे व खते खरेदी करुन पिकांचा सांभाळ लहान लेकरा प्रमाणे व विजेच्या लहरी प्रमाणे रात्रंदिवस करायचा. मात्र हे करत असताना डुक्कर नासाडी करत आहे अगदी जोमात आलेले पिके जमीनदोस्त होताना दिसत आहे.या डुकराच्या उपद्रव्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असुन मुंगी, हातगाव, कांबी, बोधेगाव, बालमटाकळी, लाडजळगाव सुकळी गायकवाड जळगाव परिसरातील या सर्व डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा.नाही तर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांचे नेतृत्वाने बोधेगाव येथे कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.असाही गर्भित इशारा शेख यांनी दिला आहे.