अहमदनगर :प्रतिनिधी ( सुखदेव गायकवाड )पारनेर तालुक्यातील सारोळा अडवाई येथील घटना जमिनीच्या वादातून मातंग समाजाची घरे पेटवली जमिनीच्या वादातून सुवर्ण वर्गातील लोकांकडून मातंग समाजाची घरे पेटून त्यांना मारहाण केल्याची घटना पारनेर तालुक्यातील सारोळा अडवाई या गावांमध्ये घडली आहे सदरच्या ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना सर्वे नंबर 208 मध्ये शेतीमध्ये भास्कर फंड या लोकांनी वैराळ या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना घडली आहे त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जाती वाचक शिवीगाळ देखील केली आहे मारहाण झालेल्या मातंग समाजाच्या गरीब कुटुंबाची घरे पेटवून प्रपंच जाळला आहे सदर कुटुंबियाचे घरातील रुग्ण सिविल हॉस्पिटल अहमदनगर मध्ये उपचार घेत आहेत त्या कुटुंबाचे नुकसान दोन लाखाचे झाले असून सदर कुटुंबियांनी न्यायाची याचिका केली आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली तरी देखील मातंग समाजावर आज देखील अन्याय होत आहे असे या समाजाकडून बोलले जात आहे मारहाण करणाऱ्या फंड कुटुंब यांना कडक शासन व्हावे आणि आम्हाला न्याय मिळावा अशा भावना व्यक्त केली .सदर घटनेची माहिती भारतीय लहुजी सेना अंतर्गत युवा सेना राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल युवा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजू भाऊ ससाने यांना मिळाली तात्काळ त्यांनी कार्यकर्त्यांसहअहमदनगर पोलीस अध्यक्ष यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की वैराळ कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ बेदम मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यात यावे यावेळी भारतीय नवनिर्माण लहुजी सेना महाराष्ट्र राज्य सहसंघटक अर्जुन ससाने सुरेशराव आढागळे राज्य प्रमुख व संघटनेचे पदाधिकारी यांनी सिविल हॉस्पिटल अहमदनगर येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली शेवगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन पारनेर तालुक्यातील सारोळा अडवाई येथे झालेल्या घटनेचा संघटना निषेध करत आहे वैराळ कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर संघटनेच्या माध्यमातून मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय लहुजी सेना अंतर्गत युवा सेना राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल , युवा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजू भाऊ ससाने यांनी दिला.