• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home नागपुर

नितीन गडकरी, कृपाल तुमाने यांच्यासह 10 खासदारांचा राजीनामा मागणार, विदर्भ आंदोलन समिती आक्रमक; कारण काय?

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 12, 2022
in नागपुर
0
नितीन गडकरी, कृपाल तुमाने यांच्यासह 10 खासदारांचा राजीनामा मागणार, विदर्भ आंदोलन समिती आक्रमक; कारण काय?
0
SHARES
4
VIEWS

राजीनाम्यासाठी संपूर्ण विदर्भात आंदोलन होणार आहे. चंद्रपुरात वामनराव चटप, नागपुरात अरुण केदार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे.नागपूर: राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोर धरला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या समितीने आता थेट विदर्भातील खासदारांनाच घेरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील दहा खासदारांचे ही समिती राजीनामे मागणार आहेत. या खासदारांच्या घर आणि कार्यालयाबाहेर जाऊन समितीच्यावतीने राजीनामे मागितले जाणार आहेत.विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून विदर्भातील खासदारांनाच घेरण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील दहाही खासदारांनी विदर्भ स्वतंत्र होण्यासाठी काहीच प्रयत्न केला नसल्याची या समितीची भावना झाली आहे. त्यामुळेच या समितीने दहाही खासदारांचा राजीनामा मागण्याचा निर्णय घेतला आहे.आज दुपारी 12 वाजता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती राजीनामा मागणार आहे. तसेच खासदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन करत त्यांच्याही खासदारकीचा राजीनामा मागितला जाणार आहे. विदर्भातील दहाही खासदारांच्या कार्यालयाबाहेर जाऊन त्यांचा राजीनामा मागितला जाणार आहे. दिवसभर हा कार्यक्रम असणार आहे.खासदारांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण विदर्भात आंदोलन होणार आहे. चंद्रपुरात वामनराव चटप, नागपुरात अरुण केदार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे विदर्भातील खासदार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.दोन वर्षानंतर म्हणजे 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वीच विदर्भवाद्यांनी आता विदर्भातील खासदारांना घेरण्यास सुरुवात केल्याने या खासदारांची डोकेदुखी वाढणार आहे. खासकरून विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपची मोठी कोंडी होणार आहे.भाजपने स्वतंत्र विदर्भ करण्याच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, दोनदा सत्तेत येऊनही विदर्भ स्वतंत्र करण्यासाठी भाजपने काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे विदर्भवादी नेते भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे आता विदर्भवाद्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्याने भाजपची डोकेदुखी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views: 118
Previous Post

राघोजी भांगरे यांनी आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले – प्रा. चव्हाण

Next Post

पुण्यातील ‘या’ भागात जाणाऱ्या PMPML बसेस होणार बंद!

Related Posts

No Content Available
Next Post
पुण्यातील ‘या’ भागात जाणाऱ्या PMPML बसेस होणार बंद!

पुण्यातील ‘या’ भागात जाणाऱ्या PMPML बसेस होणार बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!