सुकळी (प्रतिनिधी) सुखदेव गायकवाडआद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी आदिवासी समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्न केले.व ते भटकंतीपासुन कसे दूर राहतील.या उद्देशाने त्यांनी कायम लढा दिला.असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील आदिवासी महादेव कोळी वस्तीवर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची २१७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सेवा निवृत्त कामगार पोलीस पाटील बाबासाहेब साळुंके हे होते.यावेळी प्रा.चव्हाण म्हणाले की, राघोजी भांगरे यांनी शौर्याचे काम केले.व त्यांची आदिवासी समाज बांधवांसाठी मोठी तळमळ होती.अशा थोर विचारवंताचे विचार आत्मसात करून समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होऊन देखील आपल्या पर्यंत खरे स्वातंत्र्य पोहोचले का ? असे सांगून, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये आपल्याला हक्क व अधिकार दिलेले आहेत.ते अत्यंत मूल्यवान असून ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ही प्रा.चव्हाण यांनी म्हटले आहे.यावेळी संजय उगले, प्यारेलालभाई शेख, पत्रकार रावसाहेब निकाळजे, वंचितच्या महिला तालुकाध्यक्षा संगीताताई ढवळे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.यावेळी ग्रामपंचायत सदस्या मंगलताई जाधव, नितीन घोरपडे, दिगंबर बल्लाळ, कृषी, सहाय्यक सुभाष बारगजे, ग्राम पंचायत कर्मचारी नवनाथ वाल्हेकर, अशोक कांबळे, नितीन जाधव, विजू जाधव, रोहिदास जाधव, अशोक जाधव, सुनील ठोंबरे, बबन जाधव, अनिल जाधव, गणेश जाधव, महेश जाधव, रामभाऊ साबळे, अजिनाथ साळुंखे, सतीश खंबाटे, दत्तू जाधव, प्रल्हाद खोपडे, बबन कवडे, रशीद शेख, लतीफ शेख, मुनियार शेख, शकूर शेख, दौलत शेख, नबी शेख, नितीन तांबे, महेश कवात, इस्माईलभाई शेख यांचेसह चांदनगर वस्ती व गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.