सुकळी : प्रतिनिधी (सुखदेव गायकवाड )शासन निर्णयानुसार महसूल विभागामार्फत खरीप पिकाच्या नजर आणेवारी जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील ३४ गावातील पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त लावली असून ती चुकीची आणेवारी कमी करण्यात येऊन अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी लावावी. अन्यथा येत्या १५ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.असा इशारा माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी दिला आहे.माजी आ.घुले यांची राज्य साखर संघाच्या संचालक पदी निवड झाली असून त्यांचा बोधेगाव ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार बोधेगाव येथील श्री बन्नोमाॅं दर्ग्यात करण्यात आला.त्या प्रसंगी घुले बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामस्थ विजय घोरतळे होते.यावेळी बोलताना घुले म्हणाले की, चालू हंगामात परतीच्या पावसाची अतिवृष्टी होऊन शेतातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले.त्या नुकसानीचे पंचनामे चालू असतानाच तहसील कार्यालयाने ३४ खरीपाच्या गावातील आणेवारी जाहीर केली असुन ती ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने त्याचा मोठा फटका पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार असून ही आणेवारी कमी करुन अंतिम आणेवारी कमी दाखवण्यात यावी.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.असा इशारा यावेळी घुले यांनी दिला आहे.यावेळी बोधेगावचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर काका हुंडेकरी व मार्केट कमिटीचे संचालक रामनाथ राजपुरे यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमास ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलासराव नेमाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संजय कोळगे, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.प्रकाश घनवट, कुंडलिकराव घोरतळे, नाना मडके, ज्ञानदेव घोरतळे, एकनाथ कसाळ, प्रल्हाद शिंदे, विकास घोरतळे, अनिल घोरतळे, प्रसाद पवार, दातीर मामा, संतोष पावसे, नितीन पारनेरे, अर्जुन दराडे, मोहित पारनेरे, राहुल भोंगळे, विश्वनाथ कुढेकर, प्राचार्य बालाजी गायकवाड, बाळासाहेब ढाकणे, सुधाकर तहकिक, आस्मानराव घोरतळे, विठ्ठल तांबे, आकाश दसपुते, दिपक तागडे, बाबा देशमुख, लहूराव भवर, व्यंकट देशमुख, अंकुश पोटभरे, रोहिदास भोगले, यादवराव क्षिरसागर, भास्कर खेडकर यांचेसह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक माजी सरपंच रामजी अंधारे यांनी केले.आभार प्रल्हाद शिंदे यांनी मानले.