दिल्ली दि ३: PM Kisan | केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. याचं शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी 12व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र आता लवकरच या सर्व शेतकऱ्यांची (Agriculture) प्रतीक्षा संपणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यात (Finance) 2 हजार रुपये येणार आहेत. चला तर मग पीएम किसानचा 12वा हप्ता कधी जमा होऊ शकतो हे जाणून घेऊयात.
पीएम किसानचा (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्याचवेळी 30 सप्टेंबर 2022 रोजी पीएम किसानचा 12वा हप्ता खात्यात कधी जमा होणार याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. याचं पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून पोषक बीज वितरण हा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमादरम्यान पुढील हप्त्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पीएम किसानचा 12 वा हप्ता 21 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती देण्यात आली होती. ज्यात आता बदल करून हा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती देण्यात आली आहे. आता हा हप्ता दिवाळीच्या मुहूर्तावर खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे करोडो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.