त्रिवेणी नगर येथील स्पाईन रोड रस्ता रुंदीकरण करण्यात आले त्या नंतर त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण मध्ये जागा भूखंड तसेच घर गेलेल्या नागरिकांवर अन्याय करण्यात आला असून बाधित नागरिक ह्यांना भूखंड देण्यात आला नसून ज्याच्या जागा क्षेत्र कमी अथवा जास्त रस्ता रुंदीकरण मध्ये गेल्या आहेत त्यांना सव्वा गुंठा जागा देण्यात आली असून काही ठिकाणी अन्याय झाला असून त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात येणार आहे नियमानुसार जागा भूखंड देण्यात आला नसून आमदार ह्यांनी वैयक्तिक पातळीवर दुशमनी काढली आहे.भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी मोरया गोसावी संस्थानं ह्यांच्या मालकी हक्क जमीन भूखंड स्थानिक गावगुंड ह्यांनी बळकावून त्या ठिकाणी बंगले बांधले असून त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात येणार आहे चिखली मोशी भोसरी चरहोली भागात मोरया गोसावी संस्थानं ह्यांच्या करोडो रुपये किमतीच्या जमीन भूखंड गावगुंड ह्यांनी बळकावून ताब्यात घेऊन साठेखत करून खरेदी विक्री व्यवहार केले असून त्या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे.कुदळवाडी तळवडे चिखली मोशी भागातील भंगार माफिया मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असून त्या ठिकाणी १२००/१३०० भंगार गोडाऊन असून त्या मुळे मच्छर मोठ्या प्रमाणावर वाढले असून घाणीचे साम्राज्य आजूबाजूच्या परिसरात पसरले असून दुर्गंधी येत असून त्या नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून त्या ठिकाणी आगीच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून घडल्या असून त्या घटनेत १४ महिला कामगार मरण पावल्या आहेत त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात येणार आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर स्वाक्षरी करून आंबेडकरी समुदायच्या भावना दुखावल्यानंतर संविधान भवनाची निविदा प्रक्रिया सुरु असताना घाईघाईने आयुक्ताना हाताशी धरून फसवे भूमिपूजन केल्याने आंबेडकरी मतदारांचा रोष अधिकच महेश लांडगेनी ओढवून घेतला आहे.म्हणून येत्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी करण्यात आली. असून भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब तसेच भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांना भोसरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली आहे. निगडी येथील पी सी एम सी कॉलनी येथील धोकादायक इमारती मधील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करुन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.निगडी येथील सेक्टर २२ मधील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत इमारत बांधकाम संपूर्ण होऊन १३/१४ वर्ष झाली असून पात्र लाभार्थी ९२० नागरिकांना जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल इमारत मधील घर देण्यात यावे.पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित क्षेत्र २००० यार्ड रद्द करुन ५०० मीटर करण्यात यावे भोसरी विधानसभा येथील निगडी तळवडे चिखली तसेच भोसरी दिघी बोपखेल कासारवाडी दापोडी भागातील नागरिकांना रेड झोन रद्द झाल्यावर फायदा होईल.निगडी येथील आण्णा भाऊ साठे वसाहत येथील ५६० कुटुंब वास्तव्यास असून गेल्या ४० वर्षांपासून मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाही त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात येणार.सेक्टर २२ ह्या ठिकाणी संग्राम नगर फातीमा नगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील पावसाचे पाणी निचरा होत नाही त्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात येणार.सेक्टर २२ निगडी अमरधाम स्मशान भूमी तसेच मुस्लिम स्मशान भूमी अत्याधुनिक करून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार.निगडी गावठाण. साईनाथ नगर निगडी पी सी एम सी कॉलनी तसेच आण्णा भाऊ साठे वसाहत ह्या ठिकाणी भाजी मंडई रुग्णालय व व्यायाम शाळा उपलब्ध करून देण्यात येणार.छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणी भारतीय जनता पार्टी पक्षांची संपूर्ण महाराष्ट्रात बदनामी झाली असून त्या संदर्भात आपण कायमस्वरूपी पाठपुरावा करणार आहे.