प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ ऑगस्ट २०२४ आरोपीने त्याचे दोन साथीदारांसह महाराष्ट्र व गुजरात मध्ये ०८ घरफोडी केल्याचे उघड करुन अटक आरोपीचे ताब्यातुन १२,३४,०९७/-रूपये एकुण किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक २२/०६/२०२४ रोजी रात्रौ २३.३० वा. ते दिनांक २३/०६/२०२४ रोजीचे सकाळी १०.४५ वा. चे सुमारास विकी वाईन्स, चिंचवड स्टेशन चौक (शिवाजी चौक), जुना मुंबई-पुणे हायवे, चिंचवड, पुणे या दुकानाचे शटर उचकटुन अज्ञात चोरटयांनी वाईन्सचे दुकानामध्ये प्रवेश करुन घरफोडी चोरी करुन१०,७५,०००/- रू. चा एकूण माल, त्यात रोख रक्कम व विदेशी दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल चोरी करुन चोरुन नेला होता. सदर प्रकाराबाबत पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु.रजि. नं. ६०७/२०२४, भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा.पोलीस आयुक्त साो, पिंपरी चिंचवड, श्री. विनयकुमार चौबे साो, यांनी सदर बाबत आम्हास लक्ष घालुन आरोपी अटक करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार आम्ही स्वतः तसेच सहा. पोलीस आयुक्त पिंपरी विभाग, सचिन हिरे यांनी तात्काळ दाखल गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवुन पिंपरी पोलीस ठाणेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.त्यानंतर पिंपरी पोलीस ठाणेचे वपोनि यांनी त्यांचे पोलीस ठाणेचे तपास पथकाचे अधिकारी वअंमलदार यांचेसह लागलीच घटनास्थळा पासुन आरोपी गेलेत्या मार्गाचे सी.सी.टी.व्ही फुटेज पाहण्याससुरुवात केली, पिंपरी चिंचवड व पुणे शहर हद्दीतील २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन आरोपीबाबत प्राथमिक माहीत मिळुन आरोपी राहत असलेल्या परिसरात आरोपींचा शोध घेत असताना, आरोपीत्यांचेकडे असलेल्या चारचाकी वाहनातुन पोलीसांना हुलकावणी देत निघुन गेला होता. त्यानंतर त्यापुढील फुटेज चेक करीत असताना, पिंपरी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार २७२२ जानराव यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पिंपरी पोलीस ठाणे गुरजि नं.६०७/२०२४ भादवि कलम- ४५४, ४५७, ३८० मधील घरफोडी करणारा चोरटा हा वल्लभनगर एसटी स्टँड समोर आला असुन त्याने अंगात सफेद रंगाचा शर्ट व तपकीरी रंगाची पॅन्ट घातलेला आहे अशी बातमी मिळताच, पिंपरी पोलीस ठाणेचे वपोनि अशोक कडलग यांचे मार्गदर्शना प्रमाणे पिंपरी पोलीस ठाणेचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचेकडे त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव मोहम्मद रेहान अफताब शेख वय ४८ वर्ष, सध्या रा. उबाळे नगर वाघोली पुणे व मुळ रा. बैंगनवाडी शिवाजी नगर, कमला नगर गोवंडी मुंबई असे असल्याचे सांगितले. तसेच त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचे कडे सखोल तपास केला असता, त्याने त्याचे साथीदार पाहिजे असलेले आरोपी नामे १) गजराज मोतीलाल वर्मा वय अंदाजे ४० वर्ष, रा. सदर मुळगांव- मध्यप्रदेश २) सुरू चौधरी वय अंदाजे २५ वर्ष पुर्ण नाव पत्ता माहीत नाही यांचेसह सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीतील शोरूममधुन महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही ३०० मॉडेलचीचार चाकी गाडी चोरी करुन त्यावरून दाखल गुन्हया व्यतिरिक्त खालील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्नझाले आहे.१) पिंपरी पोलीस ठाणे गुरजि नं. ६०७/२०२४, भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०२) वडसाड ग्रामीण पोलीस ठाणे ( राज्य गुजरात ) गुरजि नं. ११२०००११२४१४४० / २४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५ अ ३३१ (३) (४), ५४३) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे पिं.चिं. गुरजि नं. २५३ / २०२४ भादवि कलम ४५७,३८०४) येरवडा पोलीस ठाणे पुणे शहर गुरजि नं. ३३४ / २०२४ भादवि कलम ४५४, ४५७,३८०५) हडपसर पोलीस ठाणे गुरजि नं. ६७३ / २०२४ भादवि कलम ४५७,३८०६) सहकार नगर पोलीस ठाणे पुणे शहर७) हिंजवडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड८) हिंजवडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गुरजि नं. २६४ / २०२४ भादवि कलम ३७९ गुरजि नं. ५८४ / २०२४ भादवि कलम ४५४,४५७,३८०गुरजि नं.८३२ / २०२४ भादवि कलम ४५७,३८०तसेच तपासादरम्यान अटक आरोपीचे ताब्यातुन एकुण १२,३४,०९७/- किंमतीचा खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्याचे वर्णन खालील प्रमाणे-१) एक काळया रंगाची महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही ३०० मॉडेलची चार चाकी गाडी, २) एक HIKVISIONकंपनीचा डीव्हीआर, ३) ०४ लोखंडी कटावणी, ४) लोखंडी वायर कटर, ५) शटर ओपन करण्याचे लोखंडीहँडल ६) एक स्क्रू ड्राव्हर ७) एक लोखंडी पोपट पाना ८) एक लोखंडी एक्सो करवत तिस एक्सोब्लेड लावलेले ९) एक लोखंडी पक्कड निळया रंगाची ९) एक प्लॅस्टिकचा ब्रश व पॉलीश करण्याचा पत्रा १० ) एक इंडिगो कंपनीचा ५० एमएलचा कलरचा डबा ११ ) कापडी ०५ मास्क १२) पत्राचे ०२ नंबर प्लेट त्यावर MH 12 V V 6060 असे नंबर १३) पत्राचे ०२ नंबर प्लेट त्यावर DD 03K 0528 असे नंबर १४) पत्राचे ०२ नंबर प्लेट त्यावर MH 12 VZ 1971 असे नंबर १५) फायबरची ०१ नंबर प्लेट त्यावर महाराष्ट्र ०४ एफ. ए. ५७७ असे नंबर लिहीलेली अर्धवट तुटलेली नंबरप्लेट १६) बाटा कंपनीचा पॉवर असे लिहीलेले काळया रंगाचा स्पोर्ट शूज इत्यादी साहीत्य मिळुन आला आहे.सदर कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड,मा.डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीसआयुक्त सो पिंपरी चिंचवड, मा. श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ १ पिंपरी चिंचवड, मा. श्री विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी विभाग पिंपरी चिंचवड, यांचेमार्गदर्शनाखाली अशोक कडलग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे, धनंजय कापरे, पोलीसनिरीक्षक (गुन्हे), पिंपरी पोलीस ठाणे, सुहास आव्हाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे, पिंपरी तपास पथकातील सपोनि दिगंबर अतिग्रे, पो उप निरीक्षक गणेश रायकर, पो.उप निरीक्षक शाकिर जिनेडी, पोउनि सावर्डे, पो. हवा. ११६५ बारशिंगे, पो.हवा. ६८४ हांडे, पो. हवा. ९७९ बेंदरकर, पो.हवा. ७९७ वारडे, पोहवा १४२५ शिंदे, पो. हवा. १८७ अभंगराव, पो.ना. १७६२ करपे, पो.ना. १९१७ बंड, पो.ना. १८८० मुजावर, पो.शि. २६५७ रेड्डी, पो.शि. २७२२ जानराव, पो. शि. २३५५ वाघमारे, पो.शि.२९७० काकड, पो.शि. २५७८ आचार्य, पो.शि. ३३५७ बजबळकर, पो.शि. ३६०९ ढवळे, पोशि ३३१९ पुंडे, पो.शि. ३४५३ कवठेकर, पो.शि. २५०२ भारती, मपोहवा १६८८ कोंडे, म.पो.ना. १७८६ कोल्हे, मपोशि २१७० चव्हाण यांनी केली आहे.