प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ जानेवारी २०२४ मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध्यरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेवुन त्यांचेविरुध्द कडक कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते. त्याअनुशंगाने आमचे व श्री विवेक मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ पिंपरी चिंचवडचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकचे व. पो. नि. श्री बाळकृष्ण सावंत अधिकारी व अंमलदार हे अवैध शस्त्रबाळगणारे गुन्हेगार यांची माहिती घेत होते.दरोडा विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार हे अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगांराची माहिती घेत असताना पोलीस शिपाई ब.नं. २६७३ सुमित देवकर व पोलीस शिपाई ब.नं. २६४३ गणेश सावंत यांना त्यांचे गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने दि. २४/०१/२०२४ रोजीपथकाकडील पो.उप.नि. भरत गोसावी तसेच पो.हवा १०६२ गणेश हिंगे, पो.शि. २६७३ सुमित देवकर, पो. शि. २९४७ विनोद वीर व पो.शि. २६४३ गणेश सावंत यांनी रेकॉर्डवरील आरोपी नामे विरभद्र रघुनाथ देवज्ञ वय ३० वर्षे, रा. भाऊसाहेब मुंगसे याचे खोलीत, केळगाव रोड, देवाची आळंदी पायथा हॉटेल आंळदी घाट जवळ चाकण रोड, आंळदी पुणे येथुन २१/४५ वा ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०१ लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करुन त्याचेविरुध्द दिनाक २५/०१/२०२४ रोजी ००/४४ वाजता आळंदी पोलीस स्टेशन पिं चि येथे गु.र.नं.१८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे १. राहुल बसवराज सर्जन वय ३० वर्षे रा. चक्रपाणी वसाहत हनुमान कॉलनी भोसरी, पुणे ३९, २. अमोल फिलीप साळवे वय ३० वर्षे रा. आळंदी रोड गव्हाणे पेट्रोलपंपच्या मागे विठ्ठल दर्शन सोसायटी, भोसरी पुणे यांना सुध्दा दाखल गुन्हयात दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी ११/०० वाजता अटक करण्यात आली आहे.मा.वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्हयाचा तपास दरोडा विरोधी पथकाकडे आल्यावर तपासादरम्यान दाखल गुन्हयातील अटक आरोपी नामे अमोल फिलीप साळवे वय ३० वर्षे रा. आळंदी रोड, विठ्ठल दर्शन सोसायटी, भोसरी पुणे. याचे कडुन आणखीन ०२ लोखंडी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.सदरबाबत पुढील तपास हा श्री. भरत गोसावी पोलीस उप निरीक्षक, दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा हे करीत आहे.सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो. पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्री विवके मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार गणेश सावंत, सुमितदेवकर, गणेश हिंगे, विनोद वीर, महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, पो हवा माळी, वपोशि हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.