पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने इंडियन स्वच्छता लिग २.० अंतर्गत दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अभियानाचा एक भाग म्हणून आज सेक्टर क्र.२३ जलशुद्धीकरण केंद्र अप्पू घर प्रवेशद्वाराजवळ, निगडी येथे सेवा व सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले
यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, तसेच विशेष अतिथी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उप आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र वादेवार,
मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, अण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक संस्था , प्राध्यापक ,विध्यार्थी ,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते