मुंबई : एका व्यक्तीने मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकर समोर आला आहे.या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमुळे तो थोडक्यातच बचावला, प्रेयसीवर बलात्कार झाल्यानंतर तीने आत्महत्या केली तीला त्यानंतर तिला न्याय न मिळात नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव बापू मोकाशी वय (43) वर्ष ता. आष्टी जि बीडअसून दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या आधी घडलेल्या अशाच घटनांनंतर अशा प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येथे सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान मोकाशी यांना या घटनेनंतर पोलिसांनी जाळीतून बाहेर काढत रुग्णालयात नेले.मोकाशी यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, मरीन ड्राइव्ह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार प्रेयसीवर बलात्कार झाला होता आणि त्यानंतर तीने आत्महत्या केली. यानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ते नाराज होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, चार वेळा पत्र लिहिण्यात आले, परंतु आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी काहीही केले गेले नाही, प्रेयसीला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.